Coconut Tree Information In Marathi|जाणून घ्या नारळाच्या झाडाविषयी माहिती

Coconut Tree Information In Marathi|जाणून घ्या नारळाच्या झाडाविषयी माहिती

Coconut Tree Information In Marathi
Coconut Tree Information In Marathi|

आज आपण या लेखामध्ये Coconut Tree Information In Marathi नाराळाविषयी रोचक माहिती बघणार आहोत. नारळ हे फळ बहुदा सर्वचं आवडत , त्यापासुन बनणारे पदार्थ हे खूप चविष्ठ असतात, या झाडामध्ये आणि फळामध्ये भरपूर पौष्टिक घटक असतात आणि त्याचे शारीरावर खूप चांगले परिणाम सुद्धा होतात.

नारळाचे झाड एक अशी वनस्पती आहे जी आरेकेसी कुटुंबामध्ये येते. जगभरातील वेगवेगळ्या देशांनामध्ये नारळाच्या 150 हून अधिक प्रजाती आढळू शकतात. नारळाचे झाड केवळ उष्णकटिबंधीय हवामानात वाढत असते. ही वनस्पती वालुकामय मातीवर थेट राहत असते, याला नेहमी भरपूर सूर्यप्रकाश आणि नियमित पावसाची याला आवश्यकता असते.

नारळची झाडे जगातील सर्वात विलक्षण आणि निरोगी वनस्पती आहेत. नारळाच्या झाडाचा प्रत्येक हा भाग उपयुक्त आणि पौष्टिक आहे. खुपसरे लोक फक्त नारळाचे दूध पित असतात आणि ओल नारळ खात असतात, परंतु त्याच्या पाने आणि साल देखील खूप फायदेशीर आणि परिणामकारक असतात.

नारळच्या झाडाची काही तथ्य: Coconut Tree Information In Marathi

Coconut Tree
Coconut Tree Information In Marathi|

नारळाची झाडे ही काही प्रमाणात लहान आणि खूप जास्त उंच असू शकतात. लहान नारळाची उंची २० ते ३० फूट एवढी असू शकते. आणि उंच नारळाची झाडे हि ९८ फूट असू शकते.

देठाच्या दोन्ही बाजूंना पाने असणारा  भाल्याच्या टोकावर आकाराचा

नारळाच्या झाडाला 13 ते 20 इंच लांब देठाच्या दोन्ही बाजूंना पाने असतात. पानाचा भाल्याच्या टोकावर आकाराचा आकार असतो. त्यांची लांबी 24 ते 35 इंच पर्यंत वाढू शकते. नारळाचे झाड हे मजबूत तंतुमय मुळांद्वारे जमिनीला जोडलेले असते.

नारळाचे झाडाचे फुल

नारळाच्या झाडामध्ये नर आणि मादी फुले विकसित होत असतात.

नारळाचे फळ

नारळाच्या झाडाला वनस्पतिशास्त्रानुसार वनस्पतिरुप ड्रेप (आत बी असलेले एक फळ) म्हणून ओळखले जाते. त्याचे एक वर्षानंतर फळ पूर्णपणे पिकत असते.

चांगल्या हवामानाच्या परिस्थितीमध्ये, नारळ झाडाला दर वर्षी 75 फळे येऊ शकतात, परंतु हे अत्यंत कमी वेळेस होते. नेहमी, नारळाच्या झाडाला वर्षाला 30 फळे येत असतात.

नारळाचे योग्य वजन ३.२ पौंड असते. नारळाचे पांढरे ओले नारळ कच्चे किंवा वाळवले जाऊ शकते. नारळाच्या आतील कोरड्या भागास “कोपरा” म्हणतात.दर वर्षी जगभरात 61 दशलक्ष टनचे नारळाचे उत्पादन होते आणि वितरित केले जात असते.

Healthy Benefits of coconut Tree: नारळाच्या झाडाचे फायदे

Coconut Tree Information
Coconut Tree Information In Marathi|

खर तर नारळ म्हणजे रोजच्या जेवणातील एक घटक असं म्हणू शकतो. कारण आपल्याकडे नारळाचा वापर हा अनेक पदार्थमध्ये होतो. नारळाचे असंख्य फायदे आहेत, त्यांच्या पाण्यापासून तर त्याच्यापासून तेल बनवण्या पर्यंत.

चला तर जाणून घेऊया नारळाचे फायदे ,

वजन कमी किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते

कित्येक लोकांना वजन वाढल्या कमी कसा करावा हा विचार नेहमी त्रासद्याक ठरतो. परंतु जर तू नारळ खाल तर तुमचे वजन नियंत्रित राहते बर का. एका वैज्ञानिक संशोधनानुसार सिद्ध झालाय कि नारळाचे सेवन केल्याने वजन वाढण्याची प्रक्रिया मंदावते. जर तुम्ही जेवणामध्ये नारळ घेत नसलं तर नक्की घ्या त्यांनी वाढणारे वजन नियंत्रणात येईल.

मेंदूची क्षमता वाढण्यास मदत मिळते

नारळामध्ये ब्रेन बुस्टिंग गुणधर्म आढळतात . जे पौष्टिक तत्व तुमच्या मेंदूच्या सेल्य्स ला सक्रिय करतात. त्यामुळे तुमचा मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करायला लागतो. आणि स्मृती व बुद्धी तल्लख होते. आणि मेंदूची क्षमता वाढण्यास मदत मिळते.

रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास वाढते

रोगप्रतिकारक शक्ती हि फार महत्वाची असते, आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या आजारा पासून लढण्यास सहकती देते. जर तुम्हला रोगप्रतिकारक शक्तीवाढवायची असेल तर आहारात रोज नारळाचा समावेश करा. त्यामध्ये प्रतिकारक शक्ती वाढवण्याचे घटक असतात.

थायरॉइड कार्य व्यवस्थित करण्यास मदत करते

Coconut Tree Information In Marathi|
Coconut Tree Information In Marathi|

थायरॉइड कार्य व्यवस्थित नसले कि गळ्यात विविध आजार होऊ शकतात .एका वैज्ञानिक संशोधनानुसार सिद्ध झालाय कि जी लोक जास्त नारळाचा जेवणात समावेश करतात त्यांना थायरॉइड विषयी कुठला हि आजार किंवा समस्या होत नाहीत. जर कोणाला थायरॉइड कार्य व्यवस्थित नसेल तर त्याने नक्कीच जेवणात नारळाचा समावेश करावा.

निरोगी हृदयसाठी

हृदय हा शरीराचा खूप महत्वाचा भाग आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृदय निरोगी असणे फार महत्वाचे असते. नारळ खूप पौष्टिक घटक आहेत जाणे हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. काही वेळेस डॉक्टर सुद्धा सांगतात कि नारळाचे सेवन केले पाहिजे म्हणून.

नारळाला श्रीफळ सुद्धा म्हणतात

नारळाला खूप पवित्र मानले जाते. पूजेमध्ये नारळाचा समावेश असंने हे फार म्हणवाचे असते.

सौंदर्य साठी नारळाचा उपयोग

चेहरा तेलकट होने, तेज गायब होणे यान सारख्या समस्या तरुणांना होऊ शकतात. नारळाचे पाणी हे त्वचेसाठी फार छान असते तसेच ते चेहऱ्यावर नारळाचे पाणी लावल्यास त्वचे विषयीच्या समस्या दूर होतात.

लांब केसांकरिता

नारळाचे पाणी पिल्याने केसांची चांगली वाढ होते,तसेच केस अगदी मुलायम होतात. केसांना छान चमक सुद्धा येते. तसेच नारळाचे पाणी डोक्याला एक तास लावून ठेवल्यास आणि नंतर धुतण्यास देखील चांगला फायदा होतो.

बाळाकरिता

गर्धधारणेनंतर आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा नारळपाणी पिल्यास होणारे बाळ गोरे तसेच त्याचे केस कांती सुधारते. आणि आईसाठी देखील लाभधारक ठरते.

अशे या नारळाच्या झाडाचे व फळाचे असंख्य फायदे आहेत. म्हणूनच नारळचा आपल्या जेवणात समावेश कारण फार महत्वाचं असत.

तर कसा वाटला हा लेख (coconut tree information in marathi) आवडल्यास कंमेंट नक्की करा. या आम्ही लेखात संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, तरी कोणती माहिती राहिलास आम्हला कंमेंट मध्ये कळवा, आम्ही ती माहितीचा लेखामध्ये समावेश करू. काही सुधारणा किंवा सूचना असल्यास तर आम्हाला [email protected] वर नक्की कळवा. धन्यवाद !!!!

Darjamarathicha.in वर लेख वाचल्याविषयी धन्यवाद !!!

Disclaimer: The Images & Information used in the blog (Article) don’t belong to us. We have tried to create content as per the searcher’s query with some value addition. The main intention behind this blog (Article) is only for educational and informational purpose. We don’t claim anything ours in the mentioned blog (Article). If we have added some content that belongs to you or your organization by mistake, then please let us know by emailing the details on [email protected]. We will remove the same within 48 hours. Thank you for understanding.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *