Hair Care Tips In Marathi – Hair Growth Tips in Marathi
आपले केस आपल्या सौंदर्यचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. केस हे निसर्गाने दिलेले सुंदर मुकुट आहे. प्रत्येकाची इच्छा असते कि आपले केस हे काळेशार, घनदाट व लांबलचक असावे. आणि त्या करिता प्रयत्न देखील करत असतो.
आपण विविध जाहिरात पाहतो त्यात विविध शाम्पू, कंडिशनर च्या वापरण्याने केस खूप सुंदर होतात असं दाखवतात परंतु ते एवढे महागडे शाम्पू, कंडिशनर वापरून सुद्धा केसाना काहीच फरक पडत नाही. याउलट ते अजून खराब होतात. मग करावं तरी काय ? असा हा प्रश्न कितीकचं वेळा आपल्याला पडतो ? म्हणून आम्ही आज या वर उपाय म्हणून केसांची काळजी कशी घ्यावी या विषयी काही टिप्स देणार आहोत.
केसांची निगा कशी राखावी त्या करीत उपाय : Hair Care Tips In Marathi – Hair Growth Tips in Marathi
नियमितपणे आपले केस धुवा
वाचून वेगळे वाटत असेल पण हे खर आहे. नियमितपणे धुतल्याने केसात व मुळाशी असलेली घाण निघून जाते, तसेच अतिरिक्त तेल सुद्धा निघते. त्यामुळे केस हे स्वच्छ व वाढीला लागतात. केस किती वेळा धुणे हे व्यक्तीवर अलंबुन असते. परंतु जर तुमचे खूप कोरडे असतील तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा धुवा. तसेच केस खूप तेलकट असतील तर दर तीन दिवसानी धुवा.
केस खूप जास्त गरम किंवा थंड्या पाण्याने धुवू नका.
केस केस खूप जास्त गरम किंवा थंड्या पाण्याने धुणे टाळा, केस धुताना कोमट पाण्याचा वापर करा. ज्याने केस तुटणार नाही तसेच केस चांगले राहतील.
आपल्या केसांना नियमितपणे व्यवस्थीतपाणे तेल लावा
केस धुण्याआधी केसांना तेल लावा व मालिश करा. केसांची मालिश केल्याने मुळाशी रक्त परिसंचरण सुधारते तसेच पोषण मिळते केसांना, तेलाने मालिश केल्याने केस तुटत नाहीत आणि मजबूत बनतात. आपण नारळाचे तेल, बदाम तेल अश्या प्रकारे कोणत्या पण तेल वापरू शकता.
तुम्ही हे पण करू शकता : एखाद्या वेळेस तेल कोमट करा आणि डोक्यला लावा वर नंतर टॉवेलनी केस गुंडाळून घ्या. अशे केल्याने तेल खूप छान पद्धतीने आपले काम करतो.
मोठ्या दाताचा कंगवा वापरा
केस विंचरताना मोठ्या दाताचा कंगवा वापरा. ओले केस आहे खूप नाजूक असतात , कधीच ओले केस विंचरू नये, त्याने केस तुटतात. केस हे संपूर्ण वाळल्यावर विंचरा , ज्याने केस तुटणार नाही.
केस धुण्याकरतीता केमिकॅल नसलेले शाम्पू वापरा.
आपण कोणत्या शॉम्पू केस धुण्याकरिता वापरतोय हे फार महत्वाचं असत. केमिकल असलेले शाम्पू केस विरळ करतात, केसचा रंग हिरवतात, तसेच केस तुटतात. म्हणून नेमही शाम्पू विकत घेताना कमी केमिकॅल वाला किंवा केमिकल नसलेला शाम्पू वापरा.
केसांना व्यवस्थीतपाणे कंडीशनर लावा
आपल्या कंडीशनरमध्ये काही घटक असतात जे केसाना सरळ आणि छान करतात. हे वातावरणीय आक्रमक आणि उष्मा स्टाईलपासून आपल्या केसांचे संरक्षण करते. तरीही, कंडीशनर आठवड्यातून दोनदाच करा आणि ते केवळ केसांच्या टिपांवरच म्हणजेच केसच्या शेंडयाला लावा. लावले पाहिजे. मुळांना चुकूनही लावू नये. तसेच कंडीशनर झाले कि केस स्वच्छ पाने धुवून घ्यावे. थोडेही कंडीशनर केसांवर राहू देऊ नये.
केस सुकवताना नैसार्गिग पद्धतीचा वापर करावा
बरेच लोक लवकर केस सुकवा म्हणून ड्रायर या मशीनचा वापर करतात. आणि ते एथेच चुकतात लवकर सुकवण्याच्या नादाने केस खराब व्हायला लागतात. म्हणून केस सुकवताना नैसर्गिग पद्धतीचा वापर करावा. ज्याने केस तुटणार नाहीत. केस धुतल्यानंतर त्याना मोकळ्या हवेत तसेच टॉवेलनी वाळवा. तसेच ओले केस असताना झोपू नका आणि विंचरू नका. त्याने केस तुटतात.
आपले केस नियमितपणे ट्रिम करा / थोडेशे केस कपात राहा.
प्रत्येक 6-8 आठवड्यांत आपल्या केसांना ट्रिम करा. थोडेशे केस कापल्याने एकाच केसात होणारे विभाजन नाहीसे होते. केस थोडेशे कापल्याने केस खूप वेगाने वाढत नाही अशे नाही परंतु केस निरोगी राहतात. अत्यंत कमी प्रमाणात केस वाढतात.
उन्हाळ्यात बाहेर जाताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरा
उन्हाळ्यात खूप प्रमाणात ऊन असते. जशे जास्त सूर्यप्रकाशाने तुमच्या त्वचेवर वाईट परिणाम होतो तसेच तुमच्या केसांवर सुद्धा होतो. सूर्यकिरण आपल्या केसांमधील ओलावा सुकवून टाकतात त्यामुळे केस हे कोरडे, ठिसूळ आणि वेळोवेळी खराब होतात. म्हणून सहसा उन्हळ्यात बाहेर जाताना रुमाल किंवा टोपी घाला.
बाहेर जाताना हेअर बॅन्ड वापरा
सर्वाना मोकळे केस आवडतात, परंतु मोकळे केस खूप जास्त प्रमाणात प्रदूषणाच्या आभार सुद्धा लवकर येतात, म्हणून प्रयन्त करा बाहेर जाताना केस गुंफून ठेवा जाणे ते प्रदूषणाच्या कमी अभावामध्ये येतील.
केसांना दही लावा
केसांना दही लावल्याने केसाची घनता वाढते, तसेच केस मुलायम आणि चमकदार होतात. म्हणूच आठवड्यातून एकतरी केसांना दही लावावे .
रात्री झोपताना केस हलके गुंफून ठेवा
रात्री झोपताना केस मोकळे ठेवू नका. झोपेत खूप वेळेस शरीराखाली येऊन तुटू शकतात, तसेच अंथरुणामध्ये देखील अडकू शकतात. तसेच मोकळे केस घेऊन झोपल्या सकाळी केसात खूप जास्त गुंथा होतो आणि तोच सोडवताना फार केस गळतात, म्हणून झोपताना हकले केस गुंफून झोपा.
खऱ्या पाण्याने केस धुवू नका.
केस हे नेहमी गोड्या पाण्याने धुवा, ज्याने केसाचे आरोग्य चांगले राहते, तसेच मुलायम आणि ताजेशीर होतील.
भरपूर प्रमाणात पाणी प्या
बाह्य पाण्याची पातळी आणि आंतरिक पाण्याची पातळी संतुलित असावी, त्यानेच केस निरोगी राहतात व वाढीस सुद्धा लागतात. आपण कदाचित केसांची निगा राखणारी उत्पादने आणि तेले वापरत असालच, परंतु दररोज कमीतकमी 3 लिटर पाणी पिल्याने केसांचे आरोग्य चांगले होते.
पौष्टिक जेवण घ्या
तुम्ही जे जेवण करता ते शरीराच्या प्रत्येक भागासाठी महत्वाचं असत. आपले केस प्रथिने आणि अमीनो ऍसिडने बनलेले आहेत. म्हणून त्याच्या योग्य वाढीसाठी आणि निरोगी , घनदाट केस करण्यासाठी त्यास योग्य पोषण आवश्यक असते. अंडी, बेरी, मासे, हिरव्या पालेभाज्या, गोड बटाटे हे निरोगी केसांसाठी काही उत्तम पदार्थ आहेत आणि हे आवर्जून खावेत.
केसांची निगा /काळजी कशी घ्यावी(Hair Care Tips In Marathi) लेख मध्ये सर्व टिप्स लिहण्याचा प्रयत्न केला आहे तरी कोणत्या टिप्स राहिल्या आम्हला कंमेंट मध्ये कळवा आम्ही त्याचा नक्की लेख मध्ये समावेश करू.
तर कसा वाटलं लेख आवडल्यास नक्की कंमेंट करा. तुम्ही प्रत्येक कंमेंट आम्हला अजून खूप लिहिण्यास ताकद देते. काही सुधारणा किंवा सूचना असल्यास तर आम्हाला [email protected] वर नक्की कळवा. धन्यवाद!!!
Darjamarathicha.in वर लेख वाचल्याविषयी धन्यवाद !!!
Disclaimer: The Images & Information used in the blog (Article) don’t belong to us. We have tried to create content as per the searcher’s query with some value addition. The main intention behind this blog (Article) is only for educational and informational purpose. We don’t claim anything ours in the mentioned blog (Article). If we have added some content that belongs to you or your organization by mistake, then please let us know by emailing the details on [email protected] We will remove the same within 48 hours. Thank you for understanding.
शेअर करा
Very good information. Lucky me I recently found your blog by accident (stumbleupon).
I’ve book marked it for later! https://gumroad.com/l/takipci-satin-al-tr
Very goods information. Lucky mes I ran across your website by accident (stumbleupon).
I’ve book marked it for later! https://trmedya-2.blogspot.com/
Wow that was strange. I just wrote an really long comment
but after I clicked submit my comment didn’t appear.
Grrrr… well I’m not writing all that over again. Anyhow,
just wanted to say excellent blog!