How To Control Anger In Marathi? । रागावर नियंत्रण कसे मिळवावे?

How To Control Anger In Marathi? । रागावर नियंत्रण कसे मिळवावे

How To Control Anger In Marathi
How To Control Anger In Marathi । रागावर नियंत्रण कसे मिळवावे

नमस्कार मित्रांनो,

आज आपण या लेखामध्ये अत्यंत महत्वाच्या मुद्यावर बोलणार आहोत ते म्हणजे राग कसा नियंत्रणमध्ये कसा ठेवायचा (How To Control Anger In Marathi).

कोणती गोष्ट मनाविरुद्ध झाली किंवा ती आपल्याला आवडली नाही, तर राग येतो. खरं तर राग येणे स्वाभाविक आहे. परंतु जेव्हा रागाचे प्रमाण खूप आवडते तेव्हा राग आपलाच शत्रू बनतो. जेव्हा आपल्या रागावर ताबा राहत नाही तेव्हा अंगात खूप प्रमाणात ऊर्जा निर्माण होते, ती ऊर्जा आपल्या आरोग्यासाठी हाणिकारक असते.

म्हणून राग हा नेहमी नियंत्रणमध्ये असला पाहिजे. त्यासाठी आम्ही काही टिप्स घेऊन आलो आहे. त्याआधी राग येण्याची करणे पाहुयात.

राग येण्याची लक्षणे । Symptoms Of Anger

  • अस्वस्थ वाटणे
  • काम पूर्ण न होणे
  • मनासारखे न होणे
  • दुसऱ्याला दोषी ठरवणे
  • व्येवस्थित जेवण न करणे
  • व्यायाम न करणे
  • भूतकाळाच्या गोष्टीची आठवण काढणे

राग कसा नियंत्रित करावा यासाठी टिप्स । How to Control Anger in Marathi

शांत होऊन दीर्घ श्वास घ्या

सर्वात पहिले राग आल्यावर दीर्घ श्वास घ्या. जेव्हा राग येते तेव्हा मनाला ताब्यात ठेवणे कठीण होते त्या वेळी सतत दीर्घ श्वास घ्या. असे केल्याने काही मिनिटांनी राग थोडा शांत होऊन थोड्या वेळात पूर्ण रागावर नियंत्रण येण्यास मदत मिळते.

थंड पाणी प्या

जेव्हा आपल्या रागाचा पारा खूप प्रमाणात चढला असतो तेव्हा थंडगार पाणी प्या. थंडगार पाणी पिल्याने अंगातली ऊर्जा कमी होते. तसेच रागाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच मन सुद्धा शांत होते.

शांतपणे एका ठिकाणी बसा आणि विचार करा.

राग जेव्हा अत्यंत प्रमाणात वाढतो तेव्हा कोणाशीही एक शब्द बोलू नका. कारण आपण विचार न करता बोलत असतो. अश्यावेळी फक्त एका शांत ठिकाणी जाऊन बसा. व फक्त विचार करा एवढा राग वाढण्याचे कारण काय. असे केल्याने तुम्ही थोड्याच वेळात तुमचा राग थोडा शांत होऊन जाईल.

निवांत झोप घ्या

झोप पूर्ण न झाल्याने सुद्धा रागात वाढ येते. दिवसभर कामामुळे शरीर पूर्ण थकून जाते व अश्या वेळी रागात भर पडते. म्हणून अश्या वेळी पुरेशी झोप घ्यावी त्याने मेंदू शांत राहतो व रागावर नियंत्रण राहते.

अंकांची गणना कारवी

जेव्हा राग खूप जास्त प्रमाणात वाढतो तेव्हा एका ठिकाणी बसून अंकांची गणना करण्यास सुरुवात करावी. असे केल्याने लक्ष दुसऱ्या गोष्टीकडे जाते रागाची तीव्रता कमी होण्यास मदत मिळते.

रोज प्राणायाम  करावा

जर तुमचे नेहमी नेहमी खूप जास्त राग असेल तर. तुम्ही रोज प्राणायाम  करावा . प्राणायाम केल्याने शरीर निरोगी राहते. तसेच डोकं सुद्धा शांत राहते. आणि डोकं शांत राह्ल्याने रागावर नियंत्रण लवकर येते.

लोकांना माफ करा

कधीतरी कोणी आपल्याला खूप जास्त त्रास देते आपले खूप मन दुःखवते. तेव्हा त्या लोकांना आपण माफ नाही करत. त्यानी केलेले काम आपल्या मनात असतात. त्यामुळे आपण त्याना नेमही रागाने बोलतो. अश्या त्याच्यापेक्ष्या जास्त त्रास आपल्याला होते. आपल्या मनातील चिडचिड कधी शांत नाही होत. म्हणून मन त्यांच्यासाठी नाही तर स्वतःसाठी त्यांना माफ करा त्याने तुमचे मन हलके होणार, शांत होणार व राग देखील नाहीसा होणार.

तर हे होते राग नियंत्रण ठेवण्याचे काही उपाय. कसे वाटले तुम्हाला हे आम्हाला नक्की कंमेंट मध्ये सांगा. तसेच तुमच्याकडे अजून कोणते उपाय असतील तर ते देखील नक्की सांगा.

दर्जा मराठीचा वर लेख वाचल्यास धन्यवाद……

हे लेख सुद्धा नक्की वाचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *