• Skip to primary navigation
  • Skip to main content
  • Skip to primary sidebar
  • Skip to footer

दर्जा मराठीचा!

मराठी पाऊल पडते पुढे!

  • प्रेरणास्तळ
  • प्रसंगाचे बोल
  • माहिती
    • पक्षी आणि प्राणी
    • वृक्ष, फळ आणि फुले (संबंधित)
    • सण आणि उत्सव

Marathi Letter Writing (पत्रलेखन-How to Write Marathi Letter?

February 28, 2021

Table of Contents

  • How to Write Marathi Letter? ।Marathi Letter Writing
    • पत्रलेखनाचे प्रकार: Marathi Letter Writing
    • पत्रलेखनाचे प्रकार: Types Of Letters-Marathi Letter Writing
    • पत्र लेखनसाथीच्या टीपा: How to Write Marathi Letter?
      • पत्राचा प्रकार ओळखा
      • आपण पत्राची सुरुवात व शेवट व्यवस्थित केला कि नाही हे सुनिश्चित करा
      • पत्राचा मुख्य हेतू
      • भाषेची काळजी घ्या
      • पत्राची लांबी
    • मराठीमध्ये औपचारिक पत्र कसे लिहावे?: How to Write Marathi formal Letter?
    • मराठी पत्र लेखन नमुना: Formal Marathi Letter Writing Format
    • मराठी पत्र लेखन नमुना: InFormal Marathi Letter Writing Format

How to Write Marathi Letter? ।Marathi Letter Writing

How to Write Marathi Letter?
How to Write Marathi Letter?

आज आपण या लेक मध्ये मराठी पत्रलेखन कसे लिहावे हे(How to Write Marathi Letter) जाणणार आहोत.पत्र हा एक लेखी संदेश आहे जो हस्तलिखित किंवा कागदावर छापला जाऊ शकतो. सध्याच्या काळात सामान्यत: मेल किंवा लिफाफ्यात पोस्टद्वारे आपल्या लोकांन पर्यंत पाठविले जाते.पोस्टद्वारे हस्तांतरित केलेला असा कोणताही संदेश एक पत्र आहे,जे दोन व्यक्तीमधले एक लेखी संभाषण.

आपण जेव्हा लहान होतो तेव्हा पत्रलेखन फार होते.तेव्हा लोक आपल्या जवळच्या लोकांना त्यांचा भावना, संदेश हे सर्व पत्रलेखन करून एकमेकांना पाठवायचे. परंतु जसा जसा काळ बदलला संभाषण किंवा संदेश पाठवण्याची पद्धत सुद्धा बदलली. आता फक्त पत्रलेखन हे फक्त परीक्षेतच राहिलेत. आत्ताच्या कळात आपल्याला कोणाशी बोलावसं वाटलं तर आपण त्याला एका सेकंड मध्ये फोने किंवा मॅसेज करतो आणि संभाषण करतो. सर्व सोप्प झालाय. परंतु आपली ती जुनी पत्रलेखन ची पद्धत होती ना त्यात वेगळीच जादू होती,अशे आपले पालक नेहमी म्हणतात, आणि ते खर देखील आहे.परंतु पात्र कसे लिहावे हे आपण विसरत चाललोय, म्हणून आम्ही या लेख मध्ये पत्र कास लिहावं,पत्राचे किती प्रकार असतात जे सांगणार आहोत. चला तर मग पत्रलेखनाची हि विशेष कला समजावून घेउया.

पत्रलेखनाचे प्रकार: Marathi Letter Writing

How to Write Marathi Letter?
How to Write Marathi Letter? ।Marathi Letter Writing

प्रथम आपण समजून घेऊया की पत्रलेखनाचे प्रकार प्रकार किती असतात आणि कशे असतात. औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र अशी दोन प्रकारचे पत्र आहेत.परंतु त्यानंतर पण काही प्रकारची पत्रे आहेत, जी त्यातील माहिती, पद्धत आणि पत्र लिहिण्याच्या हेतू इत्यादींवर आधारित असतात. आपण काही प्रकार समजवून घेऊया.

पत्रलेखनाचे प्रकार: Types Of Letters-Marathi Letter Writing

  • औपचारिक पत्र

औपचारिक पत्र: ही पत्र विशिष्ट नमुना आणि औपचारिकता अनुसरण करतात. या पत्रामध्ये व्यावसायिक पद्धतीचे स्वरुप काटेकोरपणे ठेवले जाते आणि संबंधित मुद्द्यांकडे थेट लक्ष दिले जाते. कोणत्याही प्रकारचे व्यवसाय पत्र किंवा अधिकारविषयी दिलेली पत्रे या श्रेणीमध्ये येतात.

  • अनौपचारिक पत्र

अनौपचारिक पत्र: या पत्रामध्ये वैयक्तिक पत्र येतात. या पत्रामध्ये कोणताही नमुना/पद्धत पाळण्याची किंवा कोणत्याही औपचारिकतेचे पालन करण्याची आवश्यकता नसते. यामध्ये वैयक्तिक माहिती येते किंवा लिखित संभाषण येते.अनौपचारिक पत्रे सहसा मित्र, ओळखी, नातेवाईक इत्यादींना लिहिली जातात.

पत्र लेखनसाथीच्या टीपा: How to Write Marathi Letter?

How to Write Marathi Letter? ।Marathi Letter Writing
How to Write Marathi Letter? ।Marathi Letter Writing

आता आपण पत्रालेखामध्ये पत्रांद्वारे संवाद साधण्याची मूलतत्वेआणि अक्षरांचे संप्रेषण करण्याच्या मूलभूत गोष्टी शिकल्या आहेत, चला तर आता पत्र लिहिताना कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे ते बघूया..

पत्राचा प्रकार ओळखा

पत्राचा प्रकार ओळखन हि स्पष्टपणे पत्रलेखन प्रक्रियेची पहिली पायरी आहे. आपल्याला आपण ज्या विषयावर पत्र लिहिणार ते कोणत्या विषय मध्ये येते हे ओळखता आलं पाहिजे. पत्राचा प्रकार आपण कोणाला पत्र लिहिताय किंवा कोणत्या विषयी लिहिताय या वर असतो.

उदाहरण: समजा तुम्ही महाविद्यालयाच्या प्राचार्यास सुट्टी विषयी लिहीत असाल तर ते एक औपचारिक पत्र झाले. आणि तेच तुम्ही खूप काळानंतर तुमच्या जुन्या महाविद्यालयीन प्राध्यापकांना लिहीत असाल तर ते मग एक वैयक्तिक (अनौपचारिक) पत्रामध्ये येणार.

आपण पत्राची सुरुवात व शेवट व्यवस्थित केला कि नाही हे सुनिश्चित करा

योग्य पद्धतीने पात्राची सुरवात हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
या पात्राची सुरुवात हि एका विशिष्ट रचनाने आणि शुभेच्छा या औपचारिक स्वरूपात होते 

पत्राचा मुख्य हेतू

एकदा आपण पत्रलेखन सुरु केले कि मुख्य हेतू लवकरच स्पष्ट करा. विशेषत: औपचारिक पत्रांमध्ये पत्राचा उद्देश त्वरित स्पष्ट करणे आवश्यक असते.

भाषेची काळजी घ्या

पत्र हे नेहमी नम्र आणि विचारशील असावे. जरी ते तक्रारीचे पत्र असले तरी मुद्दा काळजीपूर्वक व सभ्य पद्धतीने मांडला जाणे आवश्यक असते. म्हणून सर्व प्रकारच्या पत्रलेखनामध्ये सभ्य विचार आणि नागरी भाषा वापरणे आवश्यक असते.

पत्राची लांबी

पत्राची लांबी हे महत्वाचा भाग आहे . औपचारिक पत्रामध्ये नेहमी मुख्य हेतू मुद्देसूद, तंतोतंत व लहान लांबीमध्ये असावा. लांबीच्या औपचारिक पत्रांचा वाचकांवर अपेक्षित प्रभाव पडत नसतो. पत्रातील संदेश आणि ज्याला पात्र लिहितोय त्याच्या नात्यावर अनौपचारिक पत्राची लांबी निश्चित केली जाते.

How to Write Marathi Letter? ।Marathi Letter Writing
pic credit : https://www.canva.com/
How to Write Marathi Letter? ।Marathi Letter Writing

पत्रातील संक्षेपाचे स्वरूपाचे अर्थ :Marathi Letter Writing

  मा.   माननीय
श्रीम. श्रीमती 
 श्री.  श्रीयुत
 शि. सा. न. वि. वि.  शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष. 
 स. न. वि. वि.      सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
 सा. न. वि. वि.  साष्टांग नमस्कार विनंती विशेष. 
 सौ. सौभाग्यवती
 ती.  तीर्थरूप 
 चि. चिरंजीव 
Marathi Letter Writing (पत्रलेखन)|How to Write Marathi Letter?

मराठीमध्ये औपचारिक पत्र कसे लिहावे?: How to Write Marathi formal Letter?

  • प्रिय सर / मॅडमप्रमाणे संबंधित व्यक्तीस योग्यप्रकारे अभिवादन करा.
  • नेहमी पत्र लिहिताना विषयाचा उल्लेख करा.
  • आपल्या पत्रामध्ये संक्षिप्त रहा. पहिल्या परिच्छेदामध्येच पत्र लिहिण्याचे कारण लिहा. पत्र जास्त लांबवू नका.
  • योग्य स्वरूपात लिहा आणि पत्राच्या सादरीकरणाची काळजी घ्या.
  • पत्ता आणि तारीख बरोबर नमूद करा.
  • ज्याला पत्र लिहिताय त्याचे नाव आणि पद योग्यरित्या लिहा.
  • पत्र शेवट कृतज्ञतेने केला पाहिजे. पत्राचा विचार करण्यासाठी “धन्यवाद” आणि नंतर आपले नाव व स्वाक्षरीसह “तुमचा विनम्र” किंवा “खरा” असं लिहा.

मराठी पत्र लेखन नमुना: Formal Marathi Letter Writing Format

How to Write Marathi Letter? ।Marathi Letter Writing
How to Write Marathi Letter? ।Marathi Letter Writing

मराठी पत्र लेखन नमुना: १

  • तुमच्या शाळेतील मुख्यध्यापकला शाळा सोडण्याचा दाखला मिळणेकरिता विनंती अर्ज.

दिनांक- २८ फरवरी , २०२१

प्रति,

माननीय – मुख्यध्यापक

शाळेचे नाव-

(—————— ————– ————————–)

विषय –    शाळा सोडण्याचा दाखला मिळण्याबाबत

महोदय,

माझे नाव ————————असून मी गेल्या वर्षीचा सातवीचा विद्याथी आहे. मी आपल्या विद्यालयांमध्ये सातवीमध्ये प्रथम श्रेणी मध्ये पास झालो. माझ्या बाबांची बदली हि अमरावती झाली आहे. म्हणून मला दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्या करीता, शाळा सोडण्याचा दाखला पाहिजे होता. सर आपणास विनंती आहे कि आपण मला दाखला देण्याची कृपा करावी,यासाठी मी आपला आभारी आहे.

(तुमचा/तुमची आज्ञाधारक विद्यार्थी )

(—–आपले नाव ———-)

स्वाक्षरी

______________________________________________________________________________

मराठी पत्र लेखन नमुना: २

How to Write Marathi Letter?। Formal Marathi Letter Writing Format

पुस्तकांची मागणी करणारे पत्र

श्री शिवाजी हायस्कूल,

वाशीम ,जि .वाशीम

२८ ऑगस्ट २०२०

श्री व्यवस्थापक,

प्रतीक प्रकाशन

साई गार्डन , प्लॉट नं २८

कृष्णा नगर , बडनेरा

अमरावती -४४४६०७

स.न.वि.वि

आपण पाठवलेल्या आपल्या प्रकाशाची सविस्तर यादी मिळाली. त्या करीता धन्यवाद.

आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी आपली खाली दिलेली प्रकाशने कृपया त्वरीत पाठवावी.तसेच सर्व पुस्तकांच्या किंमतीवर योग्य दार लावावे आणि ग्रंथालयास मिळणारे योग्य ते कमिशन द्यावे तसेच बिल पुस्तकांसोबत पाठवावे हि विनंती.

पुस्तकाचे नाव  प्रति
इंग्लिश शब्दकोश  २००
मराठी शब्दकोश  १५०
मराठी व्याकरण  १३०

आपला विश्वासू,

(जयंत देशमुख )

मुख्याध्यापक,स्वाक्षरी

श्री शिवाजी हायस्कूल, वाशीम ,

______________________________________________________________________________
मराठी पत्र लेखन नमुना: ३

How to Write Marathi Letter?। Formal Marathi Letter Writing Format

ATM कार्ड बंद करण्याबाबचा पत्र /अर्ज

प्रति,

मा. बँक मॅनेजर,

(बँकेचे नाव व शाखा)

दिनांक -२-२-२०२१

विषय- ATM कार्ड बंद करण्याबाबत

आदरणीय सर/मॅडम,

माझे नाव (तुमचे पूर्ण नाव) असून मी आपल्या बँके शाखेचा मागच्या ३ वर्षापासूनचा खातेदार आहे. काल बस मध्ये माझे ATM कुठेतरी हरवले, मी खूप शोध घेतला पण मिळाले नाही त्या कार्ड कोणी वापर करण्याआधी ते कार्ड त्वरीत बंद करण्यात यावे हि विनंती.

(ATM कार्ड नं ————-) हा होता. आपणास विनंती आहे कि ते ATM लवकरात लवकर बंद करून मला सहकार्य करावे.

आपला विश्वासू,

(तुमचे पूर्ण नाव )

स्वाक्षरी

______________________________________________________________________________
मराठी पत्र लेखन नमुना: ४

How to Write Marathi Letter?। Formal Marathi Letter Writing Format

शिक्षक पदासाठी अर्ज

आपले पूर्ण नाव

पत्ता- विनायक कॉलनी,

राजापेठ, नागपूर

दिनांक- २०-२-२०२१

प्रति,

मा. अध्यक्ष महोदय,

(शिक्षण संस्थेचे नाव )

पत्ता-

विषय-शिक्षक पदासाठी अर्ज

संदर्भ – आपली सोमवारी दि. १२-२-२०२१ ला लोकमत मधील शिक्षकांनसाठी जागा आहेत. हि जाहिरात.

आदरणीय सर/मॅडम,

मला लोकमत पेपर मधील जाहिरातमुले कळले कि आपल्या संस्थेमध्ये शिक्षकांच्या पदासाठी जागा निघाल्या आहेत. त्यामध्ये मराठी, हिंदी या विषयासाठी १० जागा खाली आहेत. मी या संस्थेमध्ये मराठी शिक्षकाच्या पदासाठी अर्ज करीत आहे. माझ्या जवळ या जागेसाठी योग्य शिक्षण व ३ वर्षाचा अनुभव आहे.

माझी वैयक्तिक माहिती व शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

वैयक्तिक माहिती

नाव : आपले पूर्ण नाव

पत्ता : विनायक कॉलनी, राजापेठ, नागपूर

मोबाइल नं : ०००००००००

ई-मेल आइडी : [email protected]

जन्म दिनांक: ४ मे १९९५

अनुभव : ३ वर्ष

शैक्षणिक पात्रता :

परीक्षा/पदवी /प्रमाणपत्र उत्तीर्ण वर्ष   बोर्ड/विद्यापीठ % श्रेणी  
 एस. एस. सी २०१२नागपूर   ८८ अ  
 एच. एस. सी  २०१५नागपूर    ८४  अ 
बी.ए   २०१८नागपूर    ७०  अ 
अनिभव १  २०१९नागपूर    –  अ 
अनिभव २   २०२०नागपूर    –  अ 
अनिभव ३ २०२१नागपूर   – अ

मला आपल्या संस्थेत काम करण्याची संधी मिळण्यास मी प्रामाणिकपणे काम करेल. मला आपल्या संस्थेमध्ये काम करण्याची संधी दयावी ही आपणास नम्र विनंती. धन्यवाद ..

आपली विश्वासू

आपले नाव

स्वाक्षरी

______________________________________________________________________________

मराठी पत्र लेखन नमुना: InFormal Marathi Letter Writing Format

अभिनंदन पत्र 

मैत्रीण परीक्षेत पहिली आली त्या करीता तिला अभिनंदन पत्र 

दिनांक-७-४-२०२०

दत्त निवास,

साई रोड, इर्विन

वाशी ( पिनकोड )

प्रिय, केतकी

आज सकाळी पेपर मध्ये बरोबर मी तुझाच फोटो पहिला एगदी डोळ्यात आनंदाने पाणीच कळाले. तुला बुद्धिमत्तेच्या स्पर्धेत पहिला नंबर आला हे वाचून खूप खूप आनंद झाला आणि मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि हो मला पार्टी पाहिजे बरं ती पण मोठी. तुला भविष्यात अशेच यश मिळत राहो हि ईश्वर चरणी प्रार्थना. काका काकूंना माझा नमस्कार सांग. भेटू लवकरच….

तुझी प्रिय मैत्रीण,

स्वरा

______________________________________________________________________________

खाली दिलेल्या विडिओ मध्ये How to Write Marathi Letter याचे अजून उदाहरण दिलेत.

(Marathi Letter Writing (पत्रलेखन)|How to Write Marathi Letter? )

तर कशी वाटली माहिती आवडली असेल तर नक्कीच कंमेंट आणि शेअर करा. या आम्ही लेखात संपूर्ण (Marathi Letter Writing (पत्रलेखन)|How to Write Marathi Letter? )या विषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, तरी कोणती माहिती राहिलास आम्हला कंमेंट मध्ये कळवा, आम्ही ती माहितीचा लेखामध्ये समावेश करू. काही सुधारणा किंवा सूचना असल्यास तर आम्हाला [email protected] वर नक्की कळवा.

Darjamarathicha.in वर लेख वाचल्याविषयी धन्यवाद !!!

Disclaimer: The Images, Videos & Information used in the blog (Article) don’t belong to us. We have tried to create content as per the searcher’s query with some value addition. The main intention behind this blog (Article) is only for educational and informational purpose. We don’t claim anything ours in the mentioned blog (Article). If we have added some content that belongs to you or your organization by mistake, then please let us know by emailing the details on [email protected] We will remove the same within 48 hours. Thank you for understanding.

शेअर करा

Filed Under: माहिती Tagged With: Formal Marathi Letter, How to Write Marathi Letter?, Marathi Letter Writing, patralekhan, पत्रलेखनाचे प्रकार

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Follow Us

Categories

  • प्रसंगाचे बोल (7)
  • प्रेरणास्तळ (1)
  • माहिती (45)
    • पक्षी आणि प्राणी (2)
    • वृक्ष, फळ आणि फुले (संबंधित) (6)
    • सण आणि उत्सव (2)
Best Retirement Wishes In Marathi | सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा

Best Retirement Wishes In Marathi | सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा

How To Control Anger In Marathi । रागावर नियंत्रण कसे मिळवावे (1)

How To Control Anger In Marathi? । रागावर नियंत्रण कसे मिळवावे?

Surya Namaskar Information In Marathi | सूर्यनमस्कार माहिती मराठीमध्ये

2 To 30 Padhe In Marathi

2 To 30 Padhe In Marathi । मराठी पाढे । Tables In Marathi

Mantra Pushpanjali in Marathi (1)

मंत्र पुष्पांजली । Mantra Pushpanjali In Marathi

Benefits Of Drinking Water In Marathi

Health Benefits Of Drinking Water In Marathi | पाणी पिण्याचे फायदे

Dry Fruits Name in Marathi

24 Dry Fruits Name in Marathi | सुकामेवा

Shani Mantra | शनि मंत्र मराठी मध्ये

Shani Mantra | शनि मंत्र मराठी मध्ये

Archives

  • May 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • December 2021
  • October 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021
  • February 2021
  • January 2021

Search

Footer

  • Terms and conditions
  • Privacy Policy
  • DMCA
  • Contact Us
  • About Us
  • Sitemap
DMCA.com Protection Status

Copyright © 2022 Darjamarathi.in (All Images, Videos, Quotes & Some of The Information Used In Website Belongs To Their Respective Owners.)