KYC Information In Marathi | केवायसी विषयी माहिती

KYC Information In Marathi | केवायसी विषयी माहिती

KYC Information In Marathi
KYC Information In Marathi

नमस्कार मित्रांनो,

तुम्ही KYC केलीय का? KYC शिवाय हे काम होणार नाही. असं आपण किती वेळा ऐकतो. परंतु KYC म्हणजे काय हे आपल्या माहिती नसत. KYC चा long form सुद्धा माहिती नसते. म्हणून आम्ही या लेखात KYC विषयी सर्व माहिती ( KYC Information In Marathi ) सांगायचं प्रयत्न केला आहे.

आपल्याला बँकेत खाते उखडण्यासाठी, तसेच online व्यवहार  करण्यासाठी अप्स जसे कि Google pay, Phone pay आणि Paytm इत्यादीवर नोंदणी करण्यासाठी KYC ची आवश्यकता असते. तसेच Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा KYC ची आवश्यकता असते.

KYC Full Form | केवायसी चा लॉंग फॉर्म

KYC चा लॉंग फॉर्म म्हणजे हा Know Your Customer असतो. के वाय सी चा मराठीमध्ये लॉंग फॉर्म हा आपल्या ग्राहकास जाणून घ्या असा होतो. तसेच के वाय सी चा आपके ग्राहक को जानें असा होतो.

KYC Information In Marathi
KYC Information In Marathi

KYC Meaning In Marathi | केवायसी म्हणजे काय?

KYC एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामुळे ग्राहक आपली खरी ओळख सांगताय कि नाही हे समजण्यास मदत होते. KYC प्रक्रियेमध्ये कोणतेही बँक किंवा कंपनी आपल्या ग्राहकाचा पत्ता व त्याविषयी माहिती घेते. जेणेकरून कोणत्या ग्राहकाने फसवण्याचा पर्यंत केला तर त्याचे खोटेपणा पकडणे सहज शक्य होते.

जेव्हा आपण नवीन सिम घेतो, आपण आपल्या ओळखीसाठी आधार कार्ड देतो. तेव्हा त्या ओळख सांगण्याच्या प्रक्रियेला KYC म्हणतात. तसेच बँक किंवा कोणती कंपनी आपल्या ग्राहकाची ओळख म्हणून जे कागदपत्रे मागते त्याला KYC Documents म्हणतात.

Documents Required For KYC | केवायसी साठी लागणारे कागदपत्रे

आता आपण जाणून घेऊ या केवायसी साठी लागणारे कागदपत्रे. केवायसी प्रक्रियेमध्ये, ग्राहकाने सर्व प्रथम फॉर्म भरणे आवश्यक असते आणि त्या आवश्यक कागदपत्राची छायाचित्र जोडणे आवश्यक असते.

केवायसीसाठी लागणारे कागदपत्रे पुढीलप्रमाणे.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • मतदान ओळखपत्र

Types Of KYC | KYC Information In Marathi

KYC चे दोन प्रकार असतात.

  • ई-के वाय सी (EKYC)
  • सी-के वाय सी (CKYC)

या दोन्ही KYC जाणून घेऊया.

  • ई-के वाय सी (EKYC)

ई-के वाय सी चा Full Form “Electronically Know Your Customer” असा होतो. या प्रक्रियेमध्ये आपली माहिती ही डिजिटली जमा गेली जाते. या मध्ये आपले आधारकार्ड महत्वाचे असते. यामध्ये आपल्याला कोणतेही कागदपत्रे लागत नाहीत.

ई-के वाय सी मध्ये आपल्याला आपल्या अंगठाचा ठसा हा बायोमेट्रिक पद्धतीने द्यायचा असतो आणि त्या मार्फत आपोआप आपली सर्व माहिती जमा केली जाते.

  • सी-के वाय सी (CKYC)

सी-के वाय सी (CKYC) चा Full Form “Central Know Your Customer” असा होतो. हि KYC भारतातील प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्थांमध्ये केल्या जाते. हि KYC मुख्यतः शेअर मार्केट (Share Market), विमा घेताना व इन्शुरन्स  करताना केल्या जाते.

केवायसी कशी करायची । How To Do KYC?

आता KYC करायची तर कशी? हे जाऊन घेऊया. ज्या संस्थेने KYC सांगितली असते, त्यांच्या कडे KYC फॉर्म असतो. त्या KYC फॉर्ममध्ये आपली वयक्तिक, आधार कार्ड व पॅन कार्ड वर असलेली माहिती भरावी. तसेच आपल्याला या फॉर्म सोबत आधार आणि पॅन कार्ड ची झेरॉक्स जोडावे. नंतर तो फॉर्म त्या संस्थेकडे द्यावे. मग तुमची KYC ची प्रक्रिया पूर्ण होते.

खालील विडिओ पाहून तुम्हाला अजून छान समजेल KYC Information In Marathi.

KYC Information In Marathi

तर मित्रांनो कसा वाटलं आजचा लेख KYC Information In Marathi?. आज आपण यात बरीच माहिती सांगण्याचा प्रयन्त केला आहे. तरी कोणती माहिती राहिल्यास आम्हला  [email protected] नक्की कळवा. तसंच चांगला वाटल्यास कंमेंट मध्ये नक्की कळवा. आणि शेअर करायला विसरू नका. तसेच काही Suggestion, point improvement आम्हला वरील मेल ऍड्रेस पाठवा.

धन्यवाद!!

दर्जामराठीवर लेख वाचल्याबद्द्दल धन्यवाद!!!

खालील लेख वाचायला विसरू नका.

KYC विषयी अधिक माहिती विकिपीडिया

Disclaimer: Information used in the blog (Article) don’t belong to us. We have tried to create content as per the searcher’s query with some value addition. The main intention behind this blog (Article) is only for educational and informational purpose. We don’t claim anything ours in the mentioned blog (Article). If we have added some content that belongs to you or your organization by mistake, then please let us know by emailing the details on [email protected]. We will remove the same within 48 hours. Thank you for understanding.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *