ध्वनि प्रदूषण मराठी माहिती | Noise Pollution Information In Marathi

ध्वनि प्रदूषण मराठी माहिती। Dhwani Pradushan। Noise Pollution Information In Marathi

noise pollution information in marathi
noise pollution information in marathi

मित्रानो आपण आधीच्या लेख मध्ये पहिले होते कि प्रदूषण काय असते, प्रदूषणाचे करणे कोणती, त्याचे प्रकार, आणि उपाय सुद्धा. आणि लेखामध्ये आपण ध्वनि प्रदूषण माहिती पाहणार आहोत, तर चला पाहूया ध्वनी प्रदूषण म्हणजे काय तर.

ध्वनि प्रदूषण हे नाव ऐकताच आपल्या कानामध्ये मोठमोठाले आवाज, गाडीचे हॉर्न, अवतीभवती गोगाट, Dj मोठा आवाज सुरु आहे असा भास व्हायला लागतो आणि अस्वस्थ वाटायला लागत. वाहनाची गर्दी, जोराने वाजणारे हॉर्न, कारखाने व त्याचे आवाज, लाऊड स्पीकर वरून कानावर आघात करणारे आवाज हे आपल्या मानव शरीरासाठी अत्यंत वाईट परिणाम करतात. आवाजाची तीव्रता वाढली कि ती आपल्या कानाना त्रासदायक ठरते. याच कारणाने ध्वनि प्रदूषण होते.

“अत्यंत मोठा आवाज म्हणजे ध्वनि प्रदूषण होय.” मोठ्या तसेच छोट्या शहरात देखील हि समस्या खूप वाढली आहे, म्हणूनच मोठ्या शहरांमध्ये नो हॉर्न डे (No Horn Day) तसेच काही उपक्रम देखील करावे लागतात, जस कि हॉर्न प्रतिबंध क्षेत्र यांसारख्या गोष्टी लोकांच्या जागृतितीसाठी कराव्या लागतात. यावरून आपणास कळते कि ध्वनि प्रदूषणची तीव्रता किती असते.

ध्वनिची तीव्रता मोजण्याचे परिणाम “डेसिबल” हे आहे. एका विशिष्ट डेसिबलपेक्षा अधिक ध्वनि पअसल्यास हे ध्वनि प्रदूषणाचे कारण ठरतो. 80 ते 120 डेसिबल पर्यंतच्या तीव्रतेचा ध्वनि किंवा आवाज हानिकारक ठरू शकतो. माणूस साधारपणे 80 डेसिबलला बहिरा होतो. मोट-मोठ्या यंत्रसामग्री, वाहनांचे कर्कश आवाज, हॉर्न, रेल्वे डीजे, फटाके, स्फोटके व लग्नसमारंभातील बँड पथकाचे मोठे आवाज हि काही ध्वनि प्रदूषणाचे आहेत. मुंबई दिल्ली सारख्या मोठ्या शहरात प्रचंड वाहनसंख्या, लोहमार्ग, याच्या कर्कश आवाजाने तयार होतो. तसेच सणासुदीच्या दिवशी म्हणजे दिवाळी ला फोडल्या जाणाऱ्या फटाक्याने खूप आवाज होतो. तसेच विविध कार्यक्रम प्रसंगी वापरले जाणारे वाद्य, डीजे, लाऊड स्पीकर यांच्यामुळे ध्वनि प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.

आवाज व ध्वनिच्या तीव्रतेचे आरोग्य समस्यांमध्ये रोजच वाढतंय. एका आरोग्य सर्वे नुसार अधिक ध्वनिच्या ठिकाणी काम करणारी माणसे चिडचिड असतात. ध्वनिप्रदूषणामुळे रक्तदाब सुद्धा वाढतो. डोकेदुखी वाढते. बहिरेपणा येऊन कानाचे आजार देखील होतात. प्रमाणापेश्या जास्त ध्वनिमुळे “निरोसिस ” होतो. आज मुंबई हे जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर बनले आहे.

ध्वनी प्रदूषणाचे दोन प्रकारचे स्त्रोत आहेत.-ध्वनि प्रदूषण मराठी माहिती

1. घरातील ध्वनि स्त्रोत

घरामध्ये मिक्सर , वॉशिंग मशीन , कुलर, वाकूम किन्नर, यासारख्या गोष्टी खूप आवाज करू शकतात. तसेच T.V चा आवाज देखील कर्कश दायक ठरू शकतो.

2. सार्वजनिक ध्वनि स्त्रोत

सार्वजनिक ध्वनि स्त्रोत विविध आवाज येतात जसे सामाजिक कार्यक्रम बरेच सामाजिक कार्यक्रम खुल्या मैदानावर आयोजित केले जातात तसेच उपासना स्थळ देखील करणे असतात त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. बाजार पेठ आवाजासाठीचे कारण आहे.

ध्वनि प्रदूषणाचे करणे :

  • जोराने वाजणारे हॉर्न
  • Dj मोठा आवाज
  • स्फोटके
  • दिवाळीच्या दिवशी फोडल्या जाणारे फेटाके
  • वाद्य, डीजे, लाऊड स्पीकर याचा आवाज
  • लग्नसमारंभातील बँड पथक
  • कारखान्यातील विविध आवाज

प्रदूषण हटवा,

पर्यावरण आणि सजीव जीवन वाचावा……! “

ध्वनी प्रदूषणाचे परिमाण – Effects of Sound Pollution

ध्वनि प्रदूषण मराठी माहिती
ध्वनि प्रदूषण मराठी माहिती
  • ध्वनी प्रदूषणाने बहिरेपणा येऊ शकतो.
  • चिडचीडेपणा येणे.
  • कोणत्याही कामत मन न लागणे.
  • सतत बिमार सारखे वाटणे.

ध्वनि ध्वनि प्रदूषणावर उपाय करताना वाहनाचे कर्कश हॉर्न आवाजावर बंदी आणायला हवी. तसेच विनाकारण लाऊड स्पीकर लावत ध्वनि प्रदूषण करणाऱ्या, लग्नसमारंभात योग्य डेसिबलचे आवाजाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था, मंडळे यांच्यावर कारवाई करून नियमाचे पालन सक्तीचे व्हायला हवे. आपण सुद्धा एक व्यक्ती म्हणून ध्वनि प्रदूषण होणार नाही, याची जाणीवपूर्वक काळजी घ्यायला हवीच. रस्त्याच्या कडेला वृक्षाची लागवड करायला हवी.

आपण सर्वानी कमीत कमी आवाज होईल असे वर्तन करायला हवे. कामगारांना यंत्राजवळ “कानांवर संरक्षण आवरण” घालायला हवे. ध्वनि प्रदूषण रोखणे हे पूर्णपणे आपल्या सर्वांच्या कृती व वर्तनावर अवलंबून आहे. ध्वनि प्रदूषण आटोक्यात आणले नाही, तर त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर व पर्यावरणावर देखील पडत आहे. कमीत कमी आवाज होईल हाच ध्वनि प्रदूषणाचा सर्वात मोठा उपाय आहे.

ध्वनि प्रदूषण मराठी माहिती | Noise Pollution Information In Marathi

” चला ध्वनि प्रदूषण मुक्त पर्यावरणासाठी

शप्पत घेऊया…….

आणि वाढत्या या कर्कश आवाजाला दूर ठेवू या…..!’

तर कसा वाटला लेख आम्ही ध्वनि प्रदूषण मराठी माहिती या लेख मध्ये सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच कोणती माहिती राहिल्यास आम्हला कंमेंट मध्ये कळवा, आम्ही ती माहिती नक्की लेख मध्ये समाविष्ट करून घेऊ. आम्हला कंमेंट मध्ये कळवा, तुम्हची प्रत्येक कंमेंट आमच्या साठी अजून छान लिहिण्यासाठी प्रोत्साहन देते.

धन्यवाद !!!

शेअर करा !

इंग्लिश वाचाण्याकरिता इथे पहा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *