Table of Contents
गणेश चतुर्थी बद्दल माहिती (गणेशउत्सव) | Ganesh Chaturthi Information In Marathi
Ganesh Chaturthi Information In Marathi : गणेश चतुर्थी हा एक हिंदु उत्सव असून दरवर्षी 10 दिवस साजरा केला जातो. गणेश चतुर्थी ला गणेश उत्सव असे देखील म्हटले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार गणेश उत्सव मुख्यातः ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात येतो. भारतात हे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणासह बाकी ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
गणपती बाप्पांला १०८ वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. भगवान गणेश हे कला, विज्ञान आणि बुद्धीचा देव आहेत. विधी आणि समारंभांच्या सुरूवातीला त्यांची प्रथम पूजा केली जाते कारण त्यांना आरंभिक देवता जाते. भगवान गणेश ला जास्तीत जास्त गणपती किंवा विनायक म्हणून संबोधले जाते.
गणेश उत्सव जगभरातील हिंदू समुदाय मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदात साजरा करतात. गणेश उत्सव मध्ये ढोल ताशाच्या धूनवर नाचत गाजत ‘गणपती बाप्पा ची मूर्ती आणून घरी, मंडपामध्ये किंवा मंदिरामध्ये स्थापित करतात, एकमेकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतात . १० दिवस त्यांची भक्ती केली जाते आणि सोबतच संगीतखुर्ची, लिंबुचामचा असे काही खेळ पण खेळले जातात. मोदक लाडू यांचे भाविकांमध्ये वाटप केले जाते आणि बरंच काही.
चला तर गणपती बाप्पा मोरया! म्हणून पुढील लेखामध्ये आपण Ganesh Chaturthi Information In Marathi मध्ये जाणून घेऊया.
गणेश चतुर्थीचा इतिहास (कथा)
भगवान गणेश म्हणजेच गणपती बाप्पा हे भगवान शिव आणि पार्वती यांचा धाकटा मुलगा आहे. भगवान गणेशाच्या जन्मामागे अनेक कथा आहेत, पण त्यातील दोन सर्वाधिक ऐकल्या जातात.
पहिली कथा
माता पार्वती ने भगवान शिव आपल्यासोबत नसले तर, कोणी तरी आपले रक्षण करावे म्हणून आपल्या शरीराच्या मळापासून भगवान गणेशा ला निर्माण केले. मग माता पार्वती अंघोळ करत असताना तिने गणेशाला तिचे रक्षण करण्याचे कार्य सोपवले होते. देव गणेश त्यांच्या स्नानगृहाचे रक्षण करत होते. त्याच वेळी भगवान शिव घरी परतले. भगवान शिव हे कोण आहे हे गणेशला माहित नसल्यामुळे त्यांनी भगवान शिव ला थांबवले. या कार्यामुळे भगवान शिव क्रोधीत झाले त्यांना देव गणेशचा राग आला आणि त्या दोघांमध्ये भांडण झाले. या भांडण मध्ये भगवान शिव यांनी गणेशाचे डोके तोडले.
देवी पार्वतीला हे कळताच त्यांना भगवान शिव चा राग आला; त्यांनी गणेश ला परत जिवंत करा असे भगवान शिव ला सांगितले. भगवान शिव यांनी, गणेश पुन्हा जिवंत होईल असे आश्वासन माता पार्वतीला दिले. भगवान शिव मुलाच्या डोक्याचा शोध घेण्यासाठी उत्तरेकडे निघाले परंतु त्यांना फक्त हत्तीचे डोके सापडले. मग भगवान शिवाने मुलाच्या अंगावर हत्तीची डोके लावले, अश्या प्रकारे गणेश परत जिवंत झाले.
दुसरी कथा
दुसरी लोकप्रिय कथा अशी आहे की, देवांनी शिव आणि पार्वती यांना गणेश तयार करण्याची विनंती केली, जो राक्षसांचा नाश करेल आणि देवतांची मदत करेल. म्हणून गणेशाला विघनहर्त असे सुद्धा म्हटले जाते.
[ हे पण वाचा – गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा]
गणेश चतुर्थीचे महत्व
असे म्हटले जाते की, जे भक्त गणेशाची मनापासून भक्ती प्रार्थना करतात, त्यांच्या सर्व मनोकामना भगवान गणेश म्हणजेच गणपती बाप्पा पूर्ण करण्यात सक्षम असतात.
गणेश चतुर्थीचे मुख्य सार असे आहे की, त्याच्याकडे भक्त या काळामध्ये प्रार्थना करण्यासाठी येतात. या १० दिवसात गणपती बाप्पाच्या भक्ती मध्ये सर्व भक्त मग्न होतात, त्यांची खूप सेवा करतात. या सर्व भक्ती आणि प्रार्थनांना खुश होऊन गणपती बाप्पा त्यांना त्यांच्या पापांपासून मुक्त करतात आणि ते त्यांना ज्ञान आणि धर्माच्या मार्गावर नेतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून गणेश उत्सव हा सण साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळकांनी गणेश चतुर्थीला एका छोट्या उत्सवातून एका मोठ्या भव्य सार्वजनिक उत्सवात परिवर्तित केले. त्यांचा या मागील हेतू असा कि सर्व समाजातील सर्व जातींचे लोक एकत्र येणार आणि सर्वांमध्ये एकटा निर्माण होईल.
गणेश चतुर्थीमधील विधी
दहा दिवसांच्या उत्सवात चार मुख्य विधी केल्या जातात.
ते म्हणजे-
- प्राणप्रतिष्ठा
- षोडशोपचार
- उत्तरपूजा
- गणपती विसर्जन
गणपती बाप्पा येण्याची आतुरता हि गणेश उत्सवाच्या खूप पूर्व सुरु होते. मूर्तिकार सुंदर अश्या वेगवेगळ्या आकारात आणि प्रतिमेमध्ये मातीपासून मूर्ती बनवतो.
गणेशमूर्ती सुंदर सजावट केलेल्या घरे, मंदिरे किंवा परिसरातील मंडपांमध्ये स्थापित केल्या आहेत. गणेश मूर्तीला फुले, हार आणि दिवे यांनी सजविला आहे. प्राणप्रतिष्ठा नावाचा एक विधी पाळला जातो जेथे धर्मगुरुंनी जीवनाची उपासना करण्यासाठी याजक मंत्र जप करतात.
त्यानंतर गणेश मूर्तीला 16 वेगवेगळ्या प्रकारे प्रार्थना केली जाते. या विधीला षोडशोपचार म्हणतात.
लोक धार्मिक गाणी गाऊन किंवा वाजवून, ढोल ताशांवर नाचून आणि फटाके फोडून एकदम उत्साही पद्धतीने गणेश उत्सव साजरा करतात.
त्यानंतर उत्तरपुजा विधी पार पाडला जातो, जो गणेशाला सखोल आदराने निरोप देण्यासाठी असतो. यानंतर गणपती विसर्जन, या विधीमध्ये गणेशाची मूर्ती पाण्यात विसर्जित करतात. गणेशाची मूर्ती समुद्राकडे नेतात आणि त्यांचे विसर्जन करताना लोक ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करतात.
काही भाविक घरी हा सण साजरा करतात, तर काही लोक सार्वजनिक मंडळात गणेशाला भेट देतात. लोक गणेशाला योग्य आदर, प्रार्थना आणि नैवेद्य दाखवतात. गणपतीचा आवडता मोडक, पूरण पोळी, आणि करणजी सारखे पदार्थ मित्र, कुटुंब आणि भाविकांसाठी बनवतात.
गणपती बाप्पा मोरया!
Ganpati Bappa Morya!
दर्जा मराठीचा वर गणेश चतुर्थी बद्दल माहिती (गणेशउत्सव) | Ganesh Chaturthi Information In Marathi वाचल्याबद्द्दल धन्यवाद! आपल्या प्रतिक्रया कंमेंट द्वारे कळवा किंवा आम्हाला ई-मेल करा.
गणेश उत्सवाबद्दल अधिक माहिती साठी विकिपीडिया वर भेट द्या.
Disclaimer: The Images, Videos & Information used in the blog (Article) don’t belong to us. We have tried to create content as per the searcher’s query with some value addition. The main intention behind this blog (Article) is only for educational and informational purpose. We don’t claim anything ours in the mentioned blog (Article). If we have added some content that belongs to you or your organization by mistake, then please let us know by emailing the details on [email protected] We will remove the same within 48 hours. Thank you for understanding.
At this time it appears like WordPress is the preferred blogging platform out
there right now. (from what I’ve read) Is that what you’re using on your blog?
I loved as much as you will receive carried out right here.
The sketch is attractive, your authored subject matter stylish.
nonetheless, you command get got an impatience
over that you wish be delivering the following.
unwell unquestionably come more formerly again as exactly the same nearly a lot often inside case you shield this increase.
Very soon this website will be famous amid all blogging people, due to it’s
pleasant posts