यशस्वी लोक पाळत असलेले नियम । 10 Best Rules for Success In Marathi

Table of Contents

10 Best Rules for Success In Marathi । यशस्वी लोक पाळत असलेले नियम

यशस्वी लोक पाळत असलेले नियम । 10 Best Rules for Success In Marathi
यशस्वी लोक पाळत असलेले नियम । 10 Best Rules for Success In Marathi

Best Rules for Success In Marathi : नमस्कार मित्रांनो! आज आपण यशस्वी लोकांचे विचार आणि त्यांच्या १० रहस्यमयी नियमांबद्दल जाणून घेणार आहोत. बरेच लोकं त्यांच्या जीवन काळात खूप काई मिळवून घेतात. आपण त्यांच्या संघर्षाबद्दल नेहमी ऐकत असतो आणि विचार करतो कि हे सर्व भाग्यवान आहेत. त्यांना सहजपणे सर्व मिळाले. आपलं नशीबच खराब आहे किंवा अजून भरपूर काही. 

काही लोक असे पण असतात कि मी मेहनत तर करत आहे ना, मग माझा पण दिवस येणार, मी पण सर्वाना सिद्ध करून दाखवेल; पण परिणाम मात्र येतंच नाही. हे लोक खूप मेहनती असतात याबद्दल काही संदेह नाही, परंतु त्यांच्या विचार आणि काही सवयी थोड्या नकारात्मक असतात. मी पण त्यामधूनच एक आहे. या विषयाबद्दल मी भरपूर आर्टिकल वाचले काही विडिओ पण बघितले. त्यातून मला काही यशस्वी लोकांच्या काही सामान सवयी सापडल्या. यशस्वी लोकांची विचार करण्याची पद्धत समजून घेतली, तेच मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. 
मनुष्य हा ‘बुद्धी’, ‘आत्मा’ आणि ‘शरीर’ या घटकांचा बनलेला असतो.

सर्व लोकांना वाटते कि, यशस्वी होण्यासाठी बुद्धी  हा सर्वात महत्वाचा घटक आहे, तेच शरीराला एवढ गंभीरपणे घेतला जात नाही. प्रत्येकजण विचार करतो की माझे शरीर तंदुरुस्त ठेवून मला काय भेटणार आहे? मुख्यतः तरुणवर्ग. 

सहाजिक आहे जर आपण बुद्धीला अधिक प्राधान्य दिले तर ती वेगवान होईल, आपला अभ्यास चांगला होईल, तुम्हाला चांगली नोकरी मिळेल, आपण चांगला व्यवसाय कराल. परंतु हि बुद्धी शरीराचा एक भाग आहे, जर शरीर तंदुरुस्त नसेल तर बुद्धीला पण कार्य करायला नक्की काही अडथळे निर्माण होतील.

आपले जीवन हे अप्लाय विचारांचे प्रतिबिंब असते. आपण जो विचार करतो तेच आपण बनत असतो. यशस्वी बनण्यासाठी बुद्धीला चालना देणे खूप आवश्यक असते. सकारात्मक विचार आपल्याला जिंकायला मदत करतात तर नकारात्मक आपल्याला मागे ओढत असतात. या पूर्ण सवयी मध्ये सकारात्मक विचारचे भरपूर महत्व सांगितले आहे

यशस्वी लोकांच्या सवयी जाणून घेऊया. 

१. यशस्वी लोक कृतज्ञ व्यक्ती सोबत मैत्री करतात

तुम्ही नेहमी कृतज्ञ म्हणजेच नेहमी सर्व गोष्टी बद्दल आभारी किंवा नेहमी उपकार व्यक्त करणाऱ्या व्यक्तींसोबत राहा, असे व्यक्ती जे नेहमी कृतज्ञ राहील परंतु मोबदल्यात काही अपेक्षा करणार नाही. 

अगदी सोपं म्हणजे जर ज्यांना कळते कि कौतुक कसे करावे, ते तुम्हाला प्रत्येक क्षणी प्रोत्साहित करतात अश्या लोकांसोबतच यशस्वी लोक मैत्री करतात. नेहमी सकारात्मक राहण्याचे हे एक मोठे कारण आहे ज्यामुळे आपल्याला नैतिक समर्थन मिळेल. 

२. यशस्वी लोक सतत तक्रार करणाऱ्या किंवा असमाधानी लोकांचं कधीच ऐकत नाही 

असे लोकं सतत तक्रार करत राहतात. त्यांना प्रत्येक गोष्टी मध्ये समस्या पहिले दिसते. अश्या नकारात्मक लोकांपासून यशस्वी लोक दूर असतात. तुमच्या सकारात्मक बुद्धी साठी असे लोकं खूप हानिकारक असतात, यांच्या पासून जेवढा दूर तेवढा चांगलं. 

३. यशस्वी लोक शब्दांची किंमत असणाऱ्या व्यक्ती सोबत मैत्री करतात

काही लोकं बोलून दाखवतात, पण करून दाखवत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्ती सतत कोणत्या न कोणत्या गोष्टी पूर्ण करण्याचे वचन देतो पण ते कधीच पूर्ण करत नाही. यशस्वी लोकं अश्या सर्व लोकांपासुन दूर राहावं. ज्या लोकांना स्वतःच्या शब्दाची किंमत नाही, तोच दुसऱ्या व्यक्तीची किंमत कशी करणार.

४. यशस्वी लोक दिवसातल्या घडलेल्या सर्व सकारात्मक गोष्टी लिहून काढतात  

यशस्वी लोक आपल्या दिवसातल्या घडलेल्या सर्व चांगल्या गोष्टी डायरीमध्ये लिहून काढतात. तुमचा दिवस कसा पण असो, त्यातून काही चांगल्या गोष्टी नक्की मिळतील. सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टी हे आपल्या दृष्टिकोनावर निर्भर आहे. ते मोजा आणि लिहून काढा. 

५. यशस्वी लोक जे स्वतःजवळ आहे त्यात आनंदी असतात 

मानवी स्वभाव च असा आहे कि जे आपल्याजवळ नाही त्याच्यामुळे आपण लागतो. परंतु यशस्वी लोक त्यांच्याजवळ असलेल्या गोष्टी मध्ये पहिले समाधानी असतात. ज्यांचे मन समाधानी आहे तेच लोक परत नवीन मिळवतात. स्वतःजवळ असलेल्या गोष्टीचे समाधान असणे फार आवश्यक आहे.  

६. यशस्वी लोक बाकी लोकांपासून जळत नाही. 

हे सर्वात कठीण आहे. कोणी काही साध्य केलं तर काही लोकांना लगेच समस्या होते. हे लोकं अंदरच त्या लोकांपासून जळत असतात. यशस्वी लोक याच्या पूर्ण उलट असतात, ते स्वतःच्या कामामध्ये लक्ष्य देऊन आपले ध्येय साध्य करतात. 

७. यशस्वी लोक इतरांच्या यशासाठी आनंदी असतात  

यशस्वी लोकं इतरांपासून जळत नाही तर ते त्या लोकांच्या आनंदात सहभागी होतात त्यांना शुभेच्छा देतात आणि हीच गोष्ट सकारात्मकता उद्भवते. ‘जळण होणे’ हे  फक्त नकारात्मकता उद्भवते म्हणून ते त्या पासून खूप दूर असतात.   

८. यशस्वी लोक स्वतःसोबत बोलतात 

सर्वाना अंतर्मनात माहिती असते आपण  काय करायला पाहिजे किंवा काय टाळायला पाहिजे. काय बरोबर आहे अथवा काय  चुकीचे आहे. यशस्वी लोक स्वतःसोबत बोलतात (मनात विचार करतात), आणि अशाप्रकारे ते त्यांचे ठाम निर्णय घेऊ शकतात.      

९  यशस्वी लोक वेळेची किंमत करतात आणि जपून उपयोग करतात 

सर्वांकडे फक्त २४ तासच असतात, त्या वेळेला किती उपयोगी करायचं हे व्यक्ती च्या हातात असते. यशस्वी लोकं वेळेला एकदम जपून वापरतात. आपले वेळेचे  प्राधान्य कशाला किंवा कोणाला द्यायचे हे त्यांचे आधीच ठरले असते. 

१०.  यशस्वी लोक पहिले मनात श्रीमंत असतात (विचार श्रीमंत असतात) 

असे म्हटले जाते कि पहिले मनात श्रीमंत व्हा, नंतर तुम्ही वास्तव्यात श्रीमंत होणार. यशस्वी लोकांना हे  सूत्र चांगल्या प्रकारे माहिती आहे. ज्याचे  विचार,  मन हे छोटे असतात ते लोक गरीबच राहतात. मनात श्रीमंत असणं हे  या नियमांपैकी सर्वात आवश्यक आहे.   

आम्ही आशा करतो कि थोडा का होईना आम्ही तुम्हाला विचार करायला प्रवृत्त केला असावा. आमची पण मनापासून इच्छा आहे कि तुम्ही खूप यशस्वी व्हाव, आपल्या आई बाबांचा अभिमान व्हाव. आपले जीवन सुखमय आणि यशस्वी असो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

‘दर्जा मराठीचा’ वर वाचल्याबद्दल धन्यवाद!

आपला दिवस शुभ असो.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *