How To Do Meditation In Marathi| ध्यान कसे करावे?

How to do meditation in Marathi? | ध्यान कसे करावे?

meditation in marathi
meditation in marathi

Meditation In Marathi: ध्यान म्हणजे शरीराला प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीकोनाप्रमाणेच, मनाला प्रशिक्षित करण्याचा एक दृष्टीकोन. ध्यान म्हणजे एखादी वेगळी व्यक्ती, नवीन व्यक्ती किंवा त्याहून चांगली व्यक्ती बनण्याविषयी नाही. हे प्रशिक्षण निरोगी दृष्टीकोनाची जाणीव करून देण्यासाठी आहे. ध्यान म्हणजे आपण आपले विचार किंवा भावना बंद करण्याचा प्रयत्न करतो असं नाही. तर आपण कोणत्या विचार किंवा भावना निवाडावे व कोणते नाही त्यांचे निरीक्षण करणे होय. परंतु ध्यान करण्याचे बरेच तंत्र अस्तित्त्वात आहेत.

ध्यान म्हणजे काय? – What Is Meditation?

ध्यान म्हणजे शांत आणि अवचेतनाची मनाची अवस्था प्राप्त करण्याची एक अचुक साधना आहे. जे सामान्य जागृत अवस्थे पेक्षा पूर्णपणे वेगळे असते. हे स्वतःचे सर्व स्तर जाणून घेण्याचे आणि अंतःकरणातील चेतनाचे केंद्र अनुभवण्याचे साधन आहे. ध्यान करणे हा कोणत्याही धर्माचा भाग नाही, हे एक विज्ञान आहे, ध्यान हि एक प्रक्रिया, विशिष्ट क्रमाचे अनुक्रम, निश्चित तत्त्वे असतात आणि त्याचे परिणाम हे खरे असतात.

ध्यान केल्याने, मन स्पष्ट,शांत आणि आंतर भागात केंद्रित होते. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुम्ही पूर्णपणे जागृत असता , परंतु तुमचे मन बाह्य जगाकडे किंवा तुमच्या आजूबाजूला घटनांकडे लक्ष केंद्रित नाही होत.

मग आपण ध्यान कसे करावे हे कसे शिकायचे?

सर्वसाधारणपणे, ध्यान सुरू करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करणे. ध्यान करण्याच्या सर्वात सामान्य पद्धतींपैकी एकाचे उदाहरण म्हणजे एकाग्रता.

एकाग्रता ध्यान Meditation

meditation in marathi
how to do meditation in marathi

एकाग्रता ध्यानात एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे याचा समावेश होतो. तसेच श्वासोच्छ्वासावर ,एक शब्द किंवा मंत्राची पुनरावृत्ती करणे, मेणबत्तीच्या ज्योतीकडे एकटक पाहणे, पुनरावृत्ती करणारा आवाज ऐकणे किंवा माळेतील मणी मोजणे याचा देखील समावेश होतो. मनावर लक्ष केंद्रित करणे आव्हानात्मक आहे, नवीन सुरुवात कारण्यारांनी काही मिनिटेच ध्यान करावे आणि नंतर काही दिवसानी जास्त वेळ करावे.

या ध्यानामध्ये , प्रत्येक वेळी जेव्हा आपले मन भटकते हे लक्षात घेतो तेव्हा आपण लक्ष पाठलाग केद्रित करण्यासाठी निवडलेल्या वस्तूवर आपले लक्ष सहजपणे वापस आणू शकता. विचारांचा पाठलाग करण्याऐवजी आपण त्या विचारणा सहजपणे जाऊ दिले पाहिजे. या ध्यानामुले आपले लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते.

ध्यान करताना, मन स्पष्ट, निश्चिंत आणि अंतर्मुखतेने केंद्रित आहे. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुम्ही पूर्णपणे जागृत आणि जागृत होता, परंतु तुमचे मन बाह्य जगाकडे किंवा तुमच्या आजूबाजूला घडणा the्या घटनांकडे केंद्रित नसते. ध्यान करण्यासाठी एक आंतरिक स्थिती आवश्यक आहे जी अद्याप स्थिर आणि एक-बिंदू आहे जेणेकरून मन शांत होईल. जेव्हा मन शांत असेल आणि यापुढे तुमचे लक्ष विचलित करणार नाही, तेव्हा ध्यान अधिक गहन होते.

ध्याना ३ करण्याआधीच्या सूचना – Tips For Meditation

  • ध्यानासाठी एकदम पाहट, रात्र किंवा शांत वेळ निवडा.
  • ध्यान करण्यापूर्वी पोट हलके भरलेले असू द्या. पोट खूप भरलेले असेल तर ध्यान करू नका.
  • थोडासा व्यायाम आणि दीर्घ श्वासांनी सुरवात करा.

ध्यान कसे करावे : How to do meditation in marathi?

meditation in marathi
meditation in marathi
  • एका जागेवर आरामात बसून किंवा लेटून राहा. किंवा तुम्ही ध्यान करण्यासाठी खुर्ची किंवा उशीचा देखील वापर करू शकता.
  • डोळे बंद करा. लेटून असल्यास मास्क सुद्धा लावू शकता.
  • श्वास नियंत्रित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करू नका. एगदी सहजपणे श्वास घ्या.
  • आपले लक्ष श्वासावर ठेवा. प्रत्येक श्वास घेताना व सोडताना शरीराची हालचाली लक्ष्यात घ्या. आपली छाती, खांदे, बरगडे ,पिंजरा आणि पोट यांचे निरीक्षण करा. फक्त वेग किंवा तीव्रता नियंत्रित न करता आपले लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. जर आपले मन भटकत असेल तर आपले लक्ष आपल्या श्वासाकडे परत आणा.
  • सुरूवातीला ध्यान दोन ते तीन मिनिटांसाठी करा आणि नंतर काही दिवसांनी थोडा थोडा वेळ वाढवत जा.

कस कळणार ध्यान करण्याचा परिणाम ?

सरावात पहिले संयम ठेवा आणि पद्धतशीरपणे आपला सराव करत. प्रत्येक कृतीची प्रतिक्रिया असतेच. असे शक्यच नाही कि ध्यान करतय आणि तुम्हाला लाभ प्राप्त होणार नाही. तुम्हाला हे फायदे कदाचित आता लक्षात येणार नाहीत. पण हळूहळू आणि थोड्या थोड्या तुमच्या अवचेतन मनावर त्याचे संस्कार साठवत आहे. जे तुम्हाला नंतर नक्कीच दिसतील. जर आपण आज बी पेरले तर उद्या लगेच थोडी फळ येणार, त्याला थोडा वेळ हा द्यावा लागतेच.. तुम्हाला परिणाम नक्कीच दिसतील फक्त थोडे धैर्य ठेवा.

श्री श्री रविशंकर यांनी या विडिओ मध्ये खूप छान प्रकारे ध्यान कसे करावे पद्धत सांगितली आहे.. नककी पहा विडिओ नक्कीच मदत होईल.

Meditation In Marathi

आता जाणून घेऊया या ध्यानाचे काय काय फायदे आहेत.

ध्यानाचे फायदे – Benefits Of Meditation In Marathi

meditation in marathi
meditation in marathi
  • रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
  • एकाग्रता वाढायला लागते. चिडचिडपणा कमी होतो.
  • रक्त प्रवाह सुधारतो. तब्येत चांगली होते.
  • हृदयगती सुरळीत राहते.
  • ताणतणाव कमी होते, भीती वाटन कमी होते.
  • रक्तामधील कोर्टिसोल पातळी कमी होते.
  • चिंता कमी झाल्या वाटत.
  • खुश राह्यला लागता.
  • आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
  • मन प्रसन्न राहते आणि फार छान शांत झोप लागते.
  • आपला ताण व्यवस्थापित करण्यासाठी कौशल्ये तयार करणे.
  • आत्म-जागरूकता वाढविते, नकारात्मक भावना कमी करते.
  • कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढवते.

खालील विडिओ पहिल्या वर तुम्हला ध्यान विषयी अधिक माहिती फायदे माहिती होतील.

how to do meditation in marathi

या लेख आम्ही सोप्पंत सोप्पी भाषेमध्ये (Meditation In Marathi) ध्यान विषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.. ध्यान विषयी अजून सखोल माहिती तुम्हाला हवी असल्यास आम्हला कंमेंट मध्ये नक्की कळवा.. आम्ही नवीन लेख लिहू. तसेच काही सुधारणा किंवा सूचना असतील ते सुद्धा कळवाल.. हा लेख आवडल्यास कंमेंट करायला विसरू नका. तुमची प्रत्येक कंमेंट आमच्यासाठी प्रोसाहन ठरते.

तुम्हला काही प्रश्न पडलेत का? [FAQs]

  1. ध्यान किती वेळ करायला हवे?(How Long Should You Meditate?)

    ध्यान साधारणतः ४५ मिनिटे किंवा १ तास सुद्धा करू शकता. जेवढा जास्त वेळ सराव कराल तेवढाच जास्त फायदा होणार.

  2. ध्यान करायची योग्य वेळ कोणती? (What is the perfect timing for meditation? )

    ध्यान हे तुम्ही कधी सुद्धा करू शकता. शक्यतो सकाळी ४-५ वाजताचा (ब्राह्म मुहूर्त) हा वेळ सर्वात उत्तम असतो. आणि खूप फायदेशीर ठरतो.

  3. सुरुवातीला किती वेळ ध्यान करावयला पाहिजे?(How many minutes should a beginner meditate?)

    सुरुवातीला ५ मिनिटे त्या नंतर थोडं थोडं वाढवत जा. सुरुवातीला एकदम खूप जास्त करू नका.

  4. ध्यान करण्यासाठी कोणती पोजिशन (मुद्रा) घ्यावी?(HOW TO POSITION YOUR BODY FOR MEDITATION)

    जी पोजिशन तुम्हला आरामदायक व सोपी वाटत असेल ती. फक्त पाठीचा कणा सरळ ठेवा. तुम्ही बसून किंवा झोपून सुद्धा ध्यान करू शकता.

धन्यवाद!!!!

Meditation ( ध्यान) या विषयी तुम्ही अजून Wikipedia वाचू शकता.

Disclaimer: The Images, Videos & Information used in the blog (Article) don’t belong to us. We have tried to create content as per the searcher’s query with some value addition. The main intention behind this blog (Article) is only for educational and informational purpose. We don’t claim anything ours in the mentioned blog (Article). If we have added some content that belongs to you or your organization by mistake, then please let us know by emailing the details on [email protected]. We will remove the same within 48 hours. Thank you for understanding.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *