Table of Contents
Corona Patient Care In Marathi – कोरोना झाल्यावर लवकर बरं होण्याकरिता कशी काळजी घ्यावी ?
तुम्हाला कोरोना झालाय आणि तुम्ही होम आयसोलेशन असाल तर तर हा लेख तुमच्या साठी फार महत्वाचा ठरणार आहे. सर्व काही जाणून घेण्या काही महत्वाच्या सूचना : आधी तुम्ही डॉक्टरच्या संपर्कात असणे फार महत्वाचे आहे. तसेच तब्येत खूप खराब वाटत असेल तर लगेचच डॉक्टर कडे जा. कारण कोरोना ही गंभीर बिमारी आहे.
Tips For Covid patients – कोरोना झाल्यावर लवकर बरं होण्याकरिता कशी काळजी घ्यावी, यासाठी काही टिप्स.
होम आयसोलेशन – स्वतःची रूम वेगळी असावी.
स्वतःची रूम वेगळी असावी. रूम मध्ये खेळती हवा असावी. तसेच पुरेसा सूर्य प्रकाश यायला हवी. रूमला वॉशरूम, टॉयलेट हे जोडलेलं असेल अजून चांगलं.
डॉक्टरच्या संपर्कात राहा.
डॉक्टरच्या सतत संपर्कात राहा, तुम्हाला होणारा प्रत्येक होणार त्रास त्यांना कळवत राहा. डॉक्टर जे म्हणतात ते पाळा. डॉक्टरनी दिलेल्या सांगितलेल्या वेळेवर गोळ्या घ्या.
ऑक्सिजन मात्रा व तापमान चेक करत राहा.
घरी थर्मामीटर व ऑक्सिमीटर आणून ठेवा .. हे खूप महत्वाचे आहे. दिवसातून ३ वेळा ऑक्सिजन मात्रा व तापमान चेक करत राहा आणि डॉक्टरला कळवत राहा. SpO2 ऑक्सिजन मात्रा ९५ % च्या वर असायला हवे. तसचे ९५ % पेक्ष्या कमी असल्यास लगेच डॉक्टरला संपर्क करा. शरीराचे तापमान हे ९७ ते ९८ पर्यंत असल्याला हवे. ९८ च्या वर असल्यास डॉक्टरशी संपर्क करावा.
वाफ घेत राहा.
दिवसातून ३ वेळा वाफ घ्या. वाफ घेणे अत्यंत महत्वाचे आहे. गरम पाणी करा त्यात विक्स (vicks) टाका. वाफ घेतल्याने फुफ्फुसानमधील काफ कमी होण्यास कमी होते.
सतत मिठाच्या पाण्याने गुराळा करत जा.
दिवसातून 3 वेळा सतत मिठाच्या कोमट पाण्याने गुराळा (Gargle) करत जा. ( सकाळ, दुपार, रात्री ) आणि ते पण न चुकता. कोमट पाणी घ्या थोडं मीठ घ्या आणि गुराळा करा. मिठाच्या कोमट पाण्याने गुराळा केल्याने घसाला आराम मिळतो. तसेच साधी सर्दी असल्यास लवकर बसते. तुमचे १४ दिवस पूर्ण झाले तरी पण दिड महिना हे सुरूच ठेवा. कारण थोडे कोरोना चे विषाणू हे जवळपास एक महिना असतात. किंवा तुम्ही betadine gargle हे सुद्धा वापरू शकता.
भरपूर प्रमाणात पाणी प्या.
आपल्या लहानपणी तब्येत खराब झाली कि आजी आजोबा म्हणचये खुपसार पाणी प्या लवकर बर वाटणार. आपण जितके जास्त पाणी पिणार तेवढंच शरीरातील वाईट घटक बाहेर येतेय व शरीर निरोगी ठेवतात. कोरोना झाल्यावर भरपूर पाणी पित राहा, तसेच साधं पाणी जात नसेल तर ORS पावडर चे पाणी घ्या ..ORS पावडरचे पाणी पिल्याने शिरीरात ताकद येणार, पण पाणी खूप प्या.
भरपूर जेवण करा .
जेवढे तुम्ही चांगले जेवण कराल तेवढी प्रतिकारक शक्ती वाढेल. जेवणामध्ये प्रथिनेयुक्त (proteins)पदार्थ घ्या. जेवढं जास्त घेता येईल तेवढे घ्या. तुम्ही शाकाहारी असाल तर सर्व प्रकारच्या कडधान्य , दूध, पनीर, सोयाबीनच्या वड्या, पीनट बटर व फळ यांचा समावेश करा. तसेच तुम्ही मांसाहारी असाल तर अंडे, चिकन इत्यादीचा समावेश करा.
काय खाऊ नये : आंबट, खूप तिखट, मसालेदार पदार्थ खाऊ नका. बाहेरचे तेलकट पदार्थ टाळा.
बेडशीट व कपडे स्वच्छ वारंवार बदलत जा.
जेवढे आजूबाजूचे वातावरण स्वच्छ असणार तेवढच तुम्हला लवकर बरे वाटेल. म्हणून बेडशीट व कपडे स्वच्छ वारंवार बदलत जा.
दररोज श्वसनाचे व्यायाम करा.
फुफ्फुसांमध्ये चांगला ऑक्सिजन संचार होण्याकरिता रोज अनुलोम विलोम व इतर श्वसनाचे व्यायाम करा. रोज सकाळी करा.
कोणच्याही बोलण्याने कोणती व्हिटॅमिनच्या गोळी घेऊ नका.
कोणतीही गोळी डॉक्टरच्या म्हणण्याचे घ्या. अगदी व्हिटॅमिन ची देखील. प्रत्येकाचे शरीर सामान नसते म्हणून एकाला ते सहन झालं म्हणजे तुम्हला होणार असं नसते म्हणून कोणी कितीही गोळी म्हंटल तरी डॉक्टरशी संवाद करावा.
खूप समाचार पाहू किंवा ऐकू नका.
वारंवार एकच समाचार पाहिल्याने तसेच ऐकल्याने डोक दुखू शकते.
हात स्वच्छ धूत जा व मास्क घाला .
हात धुणे खूप महत्वाचे आहेत जेवण्याआधी नव्हे तसेच नाकाला, डोळ्याला हात लावण्याधी साबणाने कि हॅन्ड वॉशनी हात धूत जा. तसेच मास्क घालायला विसरू नका.
आवळा व गुळवेलचा जूस प्या.
एक पेला पाणी घ्या त्यामध्ये २ चमचा गुळवेलचा जूस आणि ३ चमचा आवळाचा जूस हे सर्व मिक्स करा आणि प्या. थोडा जरी खोकला असल्यास डॉक्टर ला विचारूनच आवळा व गुळवेलचा जूस घ्या .
जास्तीतजास्त आराम करा.
तुम्ही जेवढा जास्त आराम करणार तेवढे तुम्हाला लवकर बरे वाटणार. आराम सर्वात महत्वाचा भाग म्हणजे जेवढा शरीर आराम करेल तेवढा शरीर लवकर डॉक्टरनि दिलेल्या गोळ्यांना चांगला प्रतिसाद देईल.
कोरोना झाल्यावर कसे झोपले पाहिजे या करीत खालील विडिओ पाहा.
कोणतीही गोष्ट सुरु करण्याआधी आपल्या डॉक्टरशी नक्की संपर्क करा. खूप सारा आराम आणि खूप सारा जेवण घ्या. चांगल्या गोष्टी पहा व ऐका. नेमही चांगला विचार करा. ज्या सर्वाना कोरोना झाला आहे किंवा होऊन गेला आहे ते सर्व योध्ये आहेत हे विसरू नका. तर कसा वाटलं लेख (Corona patient care- कोरोना झाल्यावर लवकर बरं होण्याकरिता कशी काळजी घ्यावी ?) कुठल्या सूचना राहिल्या आम्हला कंमेंट मध्ये सांगा. तुमच्या सूचना कोणाला खूप मोठी मदत ठरू शकते.
Disclaimer- वरील सांगितलेल्या सूचना किंवा टिप्स डॉक्टरनि दिलेल्या नाही आहेत. या सर्व सामान्य सूचना आहेत. तुम्हाला कोणताही त्रास होत असल्यास डॉक्टरला संपर्क करा.
दर्जा मराठी वर वाचण्याबद्दल धन्यवाद!
Great post. I was checking continuously this blog and
I am impressed!
Very helpful info particularly the last part
I care for
such information a lot. I was seeking this certain information for
a long time. Thank you and good luck.
Thank you.