Surya Namaskar Information In Marathi | सूर्यनमस्कार माहिती मराठीमध्ये

Surya Namaskar Information In Marathi | सूर्यनमस्कार माहिती मराठीमध्ये

नमस्कार मित्रांनो,

आज मित्रांनो आपण या लेखात सूर्यनमस्कारविषयी माहिती मराठीमध्ये (Surya Namaskar Information in Marathi )घेऊन आलो आहे. सूर्यनमस्कार हा शब्द सूर्य आणि नमस्कार या दोन शब्दांनी बनला आहे. सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याला नमस्कार करायचा विशिष्ठ पद्धत.

सूर्यापासून आपल्याला ऊर्जा, प्रकाश आणि शक्ती मिळत असते. सूर्यामुळेच संपूर्ण पृथ्वीवरील जीव निरोगी आणि आरोग्यपूर्ण जीवन जगतात. सूर्याच्या किरणांमध्ये आजार बरे करण्याची अद्भुत शक्तीअसते. निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी सूर्यप्रकाश फार महत्त्वाचा आहे.

सूर्य नमस्कार करण्याचे १३ मंत्र । १3 Mantra of Surya Namaskar

१३ मंत्र कोणती आहे ते माहित करून घ्या.


ॐ मित्राय नमः
ॐ रवये नमः
ॐ सूर्याय नमः
ॐ भानवे नमः
ॐ खगाय नमः
ॐ पूष्णे नमः
ॐ हिरण्यगर्भाय नमः
ॐ मरीचये नमः
ॐ आदित्याय नमः
ॐ सवित्रे नमः
ॐ अकार्य नमः
ॐ भास्कराय नमः
ॐ श्री सबित्रू सूर्यनारायणाय नमः

खालील व्हिडिओ पाहून तुम्हाला आजच छान कळेल कि सूर्यनमस्कार कसा करायचा.

Surya Namaskar Information In Marathi

सूर्यनमस्कार कसा करावा । How to do Surya Namaskar

सूर्यनमस्कार हा १२ योगांचा संच संच आहे. जो तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्या व्यवस्थित कार्यरत ठेवत. सूर्यनमस्कार केल्याने शरीर मजबूत होते तसेच मन शांत राहते.

प्रणामासन

सर्वप्रथम सूर्यदयाच्यावेळी सूर्यासमोर उभे राहावे. हात छातीच्यासमोर नमस्कार स्थितीत ठेवावा. पाठ सरळ ठेवावी. श्वासोच्छवासाची गती सामान्य ठेवावी.

हस्त उत्तासन

वरच्या दिशेने श्वास घेताना हात वरती आणि थोडे मागे घ्या,तुमचे दंड कानाच्या जवळ असू द्या. ह्या मुद्रेमध्ये आपले पूर्ण शरीर-पायांच्या टाचांपासून हाताच्या बोटांपर्यंत,वरच्या बाजूला ताणायचा प्रयत्न करा.

पादहस्तासन

आता मागे वाकवून ठेवलेले दोन्ही हात आणि शरीर हळू हळू कमरेपासून समोर वाकवून जोडलेल्या दोन्ही पायांच्या अंगठाल्या स्पर्श करावेत.पण या गोष्टीकड़े लक्ष्य द्यावे की गुडघे वाकू देऊ नये.

अश्व संचालनासन

हे आसन करत असताना आपल्या उजव्या पायाला मागच्या बाजूला न्यावे आणि हाताना पुढील बाजूला जमिनीवर ठेवावे. या दरम्यान तुमचा उजवा पाय मागील बाजूला पूर्णपणे सरळ असू द्या व डावा पाय गुडघ्यातून वाकवून आपले डोके वरच्या बाजूला न्यावे.

दंडासन

आता हळूहळू दुसरा पाय देखील मागे न्यावा. मग दोन्ही पाय जुळवुन घ्यावेत. दोन्ही पाय व हात ताठ असू द्यावे.

अष्टांग नमस्कार

आता कंबर खाली घेवून, गुडघे जमिनीला स्पर्श करावेत, मग छाती व चेहऱ्याची हनवटी सुद्धा जमिनीला टेकवावी व दोन्ही हात पण खाली टेकवावेत. अश्या तऱ्हेने शरीरातील आठ अवयवांचा जमीनिशी स्पर्श होतो त्यामुळे याला ‘साष्टांग नमस्कार’ म्हणून म्हटल्या जाते.

भुजंगासना

आता हाताचे पंजे आहे त्याच ठिकाणीच ठेवा. पंजावर शरीराचा भार द्या. कोपरामधील वाक काढून टाका. हात सरळ करा. खांदे वर उचला. डोके आणि खांदे मागे खेचा.

पर्वतासन

श्वास बाहेर सोडत कंबर आणि मणक्याचा भाग वरती उंचवावा पण  दोन्ही हातांचे तळवे आणि पायांच्या टाचा जमिनीला टेकवल्या असाव्यात. काही वेळ याच स्तिथित रहावे.

अश्वसंचालसना

पर्वतासन नंतर आता तळवे खाली वाकताना छातीच्या दोन्ही बाजूंना खाली ठेवा. उजवा पाय उंचावल्यामुळे, मागचा संपूर्ण पंजा जमिनीवर बसून आपला डावा पाय दोन हात दरम्यान ठेवा.

आपल्या सोयीसाठी आपण हा पाय किंचित मागे ठेवू शकता पण टाच कोणत्याही परिस्थितीत जमिनीला स्पर्श करू नका.

पादहस्तासन

उजवा पाय डाव्या पायाजवळ आणा. सावकाश गुढघे सरळ करा. पार्श्वभाग वर उचला. सहज जेवढे वाकता येईल तेवढे खाली वाका. गुडघे किंवा टाचेवर ताण येणार नाही कडे लक्ष द्या. हनुवटी छातीला टेकवा. कपाळ गुढघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा.

हस्त उत्तासन

आता ताडासनाच्या स्थितित यावे आणि दोन्ही हाथ जोडून नमस्काराच्या स्थितित यावे,नंतर कमरेपासून वाकुन जोडलेले दोन्ही हात आणि कमरेच्या वरील भाग मागे नेवून तानुन ठेवावा.

प्रणामासन

आता परत सरळ उभे रहावे.नंतर दोन्ही हात एकत्र जोडून नमस्कार किंवा नमन करण्याच्या स्तिथित यावे.

सूर्यनमस्कार किती वेळ करायला केली?

सुरुवातीला ५ सूर्यनमस्कार पासून सुरुवात करावी. जसे जसे तुम्हाला सवय होणार मग वाढवायाला.

आता आपण जाऊन घेणार आहोत सूर्यनमस्कारचे फायदे

सूर्यनमस्कारचे फायदे । Benefits Of Suryanamskar

सूर्य नमस्कार केल्याने एकाग्रता सुधारण्यासाठी आणि मनाला शांत करण्यासाठी खुप I जास्त चांगले आहे.

सूर्य नमस्काराने पोटावरील चरबी कमी आहे तसेच वजन कमी होण्यासाठी मदत होते.

सूर्यनमस्कार नियमित केल्याने पचन समस्या, अपचन, बद्धकोष्ठता, अपचन, गॅस, सुस्तपणा आणि भूक यासारख्या समस्यांचे निराकरण केल्या जाते.

सूर्य नमस्कार करताना फुफ्फुसात श्वास घेण्यास आणि श्वासोच्छवासाच्या क्रियेतून श्वास घेण्यास पुरेशी हवा असते आणि ते रक्तामध्ये अधिक ऑक्सिजन पोहोचविण्यास कार्य करते. कार्बन डाय ऑक्साईड शरीरातून मुक्त होते आणि रक्त परिसंचरण चांगले होते.

सूर्य नमस्काराने कमर लवचिक होते आणि पाठीचा कणा मजबूत होतो तसेच शरीर निरोगी आणि सुदृढ होतात. छातीचा विकास देखील होतो.

सूर्य नमस्काराने हे केस पांढरे होने आणि कोंडापासून केसांचे संरक्षण करण्यास तसेच संसर्ग होण्याची शक्यता देखील कमी होते.

नियमितपणे व्यायाम केल्याने व्यक्तीचा हृदयरोग, उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब, मधुमेह आणि संधिवात यासारख्या रोगांचा धोका कमी होण्यास मदत होते.

सूर्य नमस्कार केल्याने महिलांसाठी अधिक फायदेशीर आहे. अनियमित मासिक पाळी अशी समस्या देखील कमी होतात.

सूर्य नमस्कार साठी काही खबरदारी | Some Precautions For Sun Salutation

सूर्यनमस्कार करताना नियमितपणे काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

  • आसन करतांना आपण कसे बसतो याचा विचार केला पाहिजे. जमीन खडबडीत परंतु सपाट नसावी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
  • सूर्य नमस्कार हे रिकाम्या पोटी करावे.
  • श्वासोच्छ्वास प्रक्रिया योग्य असावी, जर आपण योग्य प्रकारे श्वास घेत नसाल तर त्याचा आपल्या फुफ्फुसांवर वाईट परिणाम होऊ शकतो.

जर आपण या सर्व खबरदारी घेतल्या तर सूर्य नमस्कार आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे आहे. (Surya namaskar information in Marathi) ऋषी-मुनींनी हे असे सांगितले आहे की रोज सूर्यनमस्कार केल्याने तुमचे आयुष्य दुप्पट होते आणि रोग व दोषांपासून मुक्त करण्यास मदत करते.

मित्रांनो आपल्या चांगल्या आयुष्यासाठी फार महत्वाचे आहे. म्हणून आपण करायला हवे. तर कसा वाटला लेख (Surya namaskar information in Marathi) आम्ही या लेखात सर्व माहिती देण्याचा प्रयत्न कला आहे. तसेच कोणती माहिती राहिल्या आम्हाला यावर [email protected] नक्की कळवा. तसंच चांगला वाटल्यास कंमेंट मध्ये नक्की कळवा. आणि शेअर करायला विसरू नका. तसेच काही Suggestion, point improvement आम्हला वरील मेल ऍड्रेस पाठवा.

खालील लेख वाचायला विसरू नका.

धन्यवाद!!

दर्जामराठीवर लेख वाचल्याबद्द्दल धन्यवाद!!!

सूर्य नमस्कार विकिपीडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *